स्वाभिमानीचा इशारा; यावर होणार राडा!
सध्या अतिरिक्त उसाचा प्रश्न फारच गंभीर प्रश्न धारण करून उभा आहे. साखर कारखान्यांचा गाळप हंगाम अंतिम टप्प्यात आलेला असून आपला ऊस तुटावा म्हणून शेतकरी धावपळ करताना दिसत आहेत. परंतु शेतकर्यांच्या या कमजोरीचा फायदा बरेच जण घेताना दिसत आहेत. त्यामध्ये कारखान्याचे मुकादम, वाहन चालक, मशीन चालक इत्यादींना शेतकऱ्यांना पैसे द्यावे लागत आहेत. तसेच एकरी पाच ते 20 हजारापर्यंत रक्कम शेतकऱ्यांना द्यावी लागत आहे. अगोदरच शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे अशांना पैसे देण्यासाठी सावकाराचा आधार घेणे शिवाय शेतकऱ्यांकडे पर्याय नाही. या पार्श्वभूमीवर सर्व शेतकऱ्यांना त्यांचे पैसे परत मिळावेत यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि सांगली जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी सांगितले. शेतकऱ्यांकडून घेतलेले पैसे त्यांना परत द्या किंवा ऊस बिलातून ऊस तोडणीसाठी ची रक्कम जी कपात केली जाते ते बंद करा अन्यथा साखर कारखाना मोर्चा काढणार, असा आशयाचा इशारा महेश खराडे यांनी दिला आहे.
शेतात उभा असलेला ऊस तुटावा यासाठी शेतकऱ्यांनी घरातील दागिने गहाण ठेवून पैसे संबंधितांना दिले आहेत. ऊस तोडी साठी शेतकऱ्यांकडे एकरी पाच ते 20 हजार रुपयांपर्यंत रकमेची मागणी केली जात आहे. हे सर्व पैसे शेतकऱ्यांना परत मिळाले पाहिजेत यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे संबंधित मुकादम, वाहनचालक व संचालक यांच्या विरोधात तक्रार करण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढे येणे आवश्यक आहे. यासाठीकोणत्या कारखान्याला गेला आहे त्या कारखान्याचे नाव, संबंधित शेतकऱ्याचे नाव, मुकादमाचे नाव, त्याचे गाव, वाहन चालकाचे नाव तसेच मशीन मालकाचे नाव या सर्वांनी घेतलेल्या रक्कम बद्दलची सविस्तर माहिती जमा करायचे आहे. ही तक्रार संबंधित साखर कारखाना व साखर आयुक्तांकडे करावी असे देखील महेश खराडे यांनी सांगितले. शेतकऱ्यांनी दाखल केलेल्या तक्रारींची दखल घेऊन त्यांची खात्री करा आणि त्यांनी पैसे घेतले त्यांच्या बिलातून ही रक्कम कपात करून शेतकऱ्यांना परत द्या किंवा प्रति टन ऊस बिलातून ऊसतोडणी व वाहतुकीसाठी कारखाने सहाशे ते सातशे रुपये कारखाने कपात करतात.
ती कपात बंद करावी कारण साखर कारखान्याचा तोडणीचे पैसे कपात करत असतील तर पुन्हा तोडण्यासाठी पैसे शेतकऱ्यांना द्यावे लागत असतील तर पुन्हा शेतकर्यांना ऊस तोडण्यासाठी पैसे देण्याची काहीच गरज नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची दुहेरी पद्धतीने होत असलेली ही लूट थांबवण्यासाठी शेतकऱ्यांनी तयार व्हावे. अगोदर यासंबंधी साखर कारखानदारांची चर्चा केली जाईल त्यानंतर प्रत्येक कारखान्यावर मोर्चाचे आयोजन केले जाईल असा इशारा महेश खराडे यांनी दिला आहे.