कांदा उत्पादनात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर; वाचा सविस्तर
देशातून (Export of agricultural goods) शेतीमालाच्या निर्यातीमध्ये मोठा वाढ होत आहे. त्यामुळे परकीय चलनाचा लाभ शेतकऱ्यांना होत आहे. खाद्यपदार्थांबरोबरच धान्य, भाजीपाला, फुले, फळांच्या निर्यातीमध्येदखील लक्षणीय वाढ होत आहे. शेतीपध्दतीमध्ये यांत्रिकिकरणाचा वापर आहे आणि पीक पध्दतीमध्ये होत असलेला बदल यामुळे निर्यातीमध्ये वाढ होत आहे. लहान (Onion Export) कांदा निर्यातीमध्ये तर गेल्या 9 वर्षामध्ये अमूलाग्र दबल झाला आहे. तब्बल 487 टक्क्यांनी निर्यात वाढलेली आहे. 2013 पासून आतापर्यंत 487 टक्के वाढ झाली आहे. कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री कैलाश चौधरी यांनी यासंदर्भात माहिती दिलेली आहे. विशेष: म्हणजे महाराष्ट्राचा यामध्ये सर्वाधिक वाटा राहिलेला आहे. ‘भारताच्या जागतिक स्तरावर (Export of small onions) छोट्या कांद्याच्या निर्यातीत 487 टक्के वाढ झाली आहे. त्यामुले शेतकऱ्यांना तर फायदा तर झालाच आहे पण जागतिक पातळीवर वेगळा ठसा उमटला आहे. एकीकडे निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतीपिकाचे नुकसान होत आहे तर दुसरीकडे निर्यातीमधून दिलासाही मिळत आहे.
भारतात दरवर्षी सुमारे 200 दशलक्ष टन कांद्याचे उत्पादन होते. एकूण उत्पादनाच्या 90% पर्यंत देशांतर्गत वापरासाठी वापरले जाते तर उर्वरित साठा करुन योग्य वेळी तो निर्यात केला जातो. भारत दरवर्षी सर्व देशांना कांदा निर्यात करतो. कांदा उत्पादनात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. दुसऱ्या क्रमांकावर गुजरात आणि त्यानंतर अनुक्रमे हरियाणा, ओडिशा, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान या राज्यांमध्ये कांद्याची लागवड केली जाते. निर्यातीतील वाढीचा फायदाही या शेतकऱ्यांना होतो. सर्वाधिक उत्पादन करणारे राज्य असलेल्या महाराष्ट्रात यावेळी कांद्याच्या उत्पादनात वाढ झाली आहे. कृषी विभागाच्या अहवालानुसार उन्हाळ्यात पिकणाऱ्या कांद्याच्या उत्पादनात 30 टक्क्यांनी वाढ झाली आहे. भारत सरकारने निर्यात धोरणात कोणताही बदल केला नाही तर त्याचा फायदा शेतकऱ्यांना होईल. अनेकदा देशात कांद्याचे भाव वाढल्यानंतर सरकार निर्यातीवर बंदी घालते.
गेल्या काही वर्षांत भारत कृषी निर्यातीच्या क्षेत्रात नवनवे विक्रम प्रस्थापित करत आहे. गेल्या महिन्यात वाणिज्य मंत्रालयाने म्हटले होते की, देश कृषी निर्यातीच्या क्षेत्रात यावेळी नवे विक्रम प्रस्थापित होत आहेत. चालू आर्थिक वर्षात भारताची शेती मालाची निर्यात वाढलेले आहे. मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार चालू आर्थिक वर्षात सध्याची विकासदराची पातळी पाहता भारताची कृषी निर्यात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात निर्यात झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना चार पैसे मिळाले आहेत. जागतिक स्तरावरील बाजारपेठेत देखील भारत देशाचे वेगळे स्थान निर्माण झाले आहे.