मुंबई APMC मार्केट यंदाही जाणार पाण्यात! प्रशासनासह संचालक सुद्धा अपयशी: राजेंद्र पाटील
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्सून पूर्व कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. त्यानूसार नवी मुंबई महापालिकेने देखील युद्धपातळीवर कामे सुरु केली आहे. मात्र, बाजार समितीच्या ढिसाळ नियोजनामुळे बाजार समितीमध्ये कोणतेही काम सुरु करण्यात आली नाहीत. शिवाय काही काढण्यात आलेल्या निविदा देखील रद्द करण्यात आल्या आहेत. आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या मुंबई बाजार समितीने कोणतेच नियोजन केले नाही. त्यामुळे हि बाजार समिती पावसाळ्यात पाण्यात बुडून जाणार आहे असे मला वाटते. मी बाजार समितीचा संचालक असून नियमित होणाऱ्या बैठकांमधून विविध प्रश्नांवर मी अशाप्रकारे आवाज उठवत असतो. अन्याला वाचा फोडण्याचे काम प्रामाणिकपणे करतो. बाजार समितीमधील सत्ताधारी मताच्या जोरावर आमचे विषय पारित केले जात नाहीत. शिवाय निषेध नोंदवा आणि पुढे चला असे त्यांचे वाक्य असते. याबाबत पणन संचालकांकडे अपील केले आहे. त्यांच्याकडील अपिलामधून काही निष्पन्न नाही झाले. तर उच्च नायालयामध्ये दाद मागणार आहे. असा आरोप संचालक राजेंद्र पाटील यांनी केला आहे.
सध्याचे तापमान पाहता राज्यात मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज बांधला जात आहे. त्यामुळे मुंबईसह नवी मुंबई, पनवेल मध्ये पावसाचे जोरदार आगमन होऊ शकते. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मुंबई APMC मार्केट पाण्यात जाणार हे निश्चित झाले आहे. गेल्या वर्षी पहिल्याच पावसात मार्केट पाण्यात गेल्याने मुंबई एपीएमसी मधील पाचही मार्केटमध्ये पाणी साचून बाजार घटकांचे चांगलेच हाल पाहायला मिळाले होते. तर हे दरवर्षीचेच रडगाणे असल्याचे जेष्ठ बाजार घटक सांगत आहेत. दरवर्षी बाजार समिती प्रशासनाचा मान्सूनपूर्व कामांचा दावा फोल ठरत आहे.
एपीएमसी मार्केट दरवर्षी मान्सूनपूर्व कामांसाठी कोट्यवधी रुपये खर्च करत आहेत. मात्र, नियोजन शून्य अभियंत्यांमुळे मार्केट पाण्यात जात असल्याचा आरोप बाजार घटक करत आहेत. मान्सूनपूर्व कामांचा फक्त देखावा केला जात असून या कामात भ्रष्टाचार होत असल्याने हि कामे मार्गी लागत नसल्याचाही आरोप होत आहे. तर गेली अडीच वर्षापासून बाजार सदस्य निवडून येऊन देखील मार्केटच्या मूलभूत सुविधा बदलल्या न गेल्याने बाजार सदस्य देखील निष्क्रिय असल्याची भावना बाजार घटक व्यक्त करत आहेत.
जवळपास पाचही मार्केटच्या परिसरात आणि प्रवेशद्वारावर पाण्याचा तलाव निर्माण होता. जोरदार पावसात काही मार्केटमध्ये धबधब्यासारखे पाणी पडते. धान्य मार्केटमध्ये रस्त्याची कामे अर्धवट राहिल्याने खड्यात रस्ता गेला आहे. तर मार्केटच्या गाडी धक्यावर सुद्धा पाणीच पाणी पहायला मिळते. शिवाय सफाई करण्यात आलेल्या गटारांमधील घाण न काढल्याने आणि पावसाआधी काम न केले गेल्याने गटारे तुंबून धक्क्यावर त्रास होणार आहे.