60 टक्के वाळवंट आहे तरीही जगभरात भारी आहे इस्रायलची शेती, हवेत पीक घेतात, कॉम्पुटर देते शेताला पाणी, पहा त्यांची ‘ही’ नवी टेक्निक
 
Agricultural News : इस्रायल व हमास यांमध्ये सुरू असलेल्या युद्धाबाबत सध्या चर्चा सुरू आहे. फक्त 90 लाख लोकसंख्या असलेला इस्रायल हा देश लष्करी तंत्रज्ञानाबरोबरच अनोख्या शेतीसाठी जगभर प्रसिद्ध होत आहे. या देशात विविध कृषी तंत्रज्ञान वापरले जात आहे.
जगभरातील देश यांचे अनुकरण करत आहे. या नव्या टेक्निक ने त्यांचे अन्नधान्य उत्पादन वाढले आहे. सध्या भारतच विचहर केला तर भारतात देखील स्रायली तंत्रज्ञानाचा अवलंब अनेक प्रगतशील शेतकरी करताना दिसतात.
करत आहे. शेतीचे आधुनिक तंत्र शिकण्यासाठी भारतीय शेतकरी दरवर्षी इस्रायलला जातात. चला तर मग आज जाणून घेऊया इस्रायल कशा प्रकारे शेती करत आहे व कोणते तंत्रज्ञान वापरत आहे.
इस्रायलकडे भारतासारखी सुपीक भूमी नाही. येथील हवामानही शेतीसाठी योग्य नाही. इस्रायलमध्ये खूप कमी पाऊस पडतो, असं म्हटलं जातं. तसेच अनेक भागात प्रचंड उष्णता आहे. असे असूनही इस्रायली शेतकरी आधुनिक तंत्रज्ञान विकसित करून शेतीतून भरपूर कमाई करत आहेत.
तांदूळ आणि गव्हाचीही लागवड करता येते
इस्रायलचा ६० टक्के भाग वाळवंट आहे. येथे लागवडीयोग्य जमीन फारच कमी आहे. अशा तऱ्हेने या समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी येथील शेतकऱ्यांनी वर्टिकल फार्मिंगचे तंत्रज्ञान विकसित केले. ही अतिशय आधुनिक शेती पद्धत आहे.
खरं तर इस्रायलची निम्म्याहून अधिक लोकसंख्या शहरांमध्ये राहते. अशा परिस्थितीत शहरात राहणाऱ्या लोकांनी शेतीसाठी वर्टिकल फार्मिंग पद्धतीचा विकास केला. या तंत्रात घराच्या भिंतीवर एक छोटेसे शेत बनवले जाते, त्यावर शेती केली जाते. सध्या इस्रायलमध्ये अनेक लोक आपल्या घराच्या भिंतींवर भाजीपाल्याची लागवड करत आहेत. विशेष म्हणजे या टेक्निकद्वारे भिंतींवर तांदूळ आणि गव्हाची ही लागवड करता येते असे तज्ञ म्हणतात.
मत्स्यपालनाची टेक्निक
माशांचे नाव ऐकले की पहिले नाव समोर येते ते म्हणजे पाणी. पाण्याशिवाय मासे जगू शकत नाहीत. अशा परिस्थितीत मत्स्यशेतीसाठी भरपूर पाणी लागते. पण इस्रायलमधील लोक वाळवंटातही मत्स्यपालन करत आहेत.
विशेष म्हणजे प्रगत जीएफए अर्थात ग्रो फिश एनीव्हेयर तंत्रज्ञानाच्या माध्यमातून इस्रायलमधील शेतकरी वाळवंटात मासे पाळत आहेत. या प्रणालीमुळे मत्स्यव्यवसायासाठी वीज आणि हवामानातील अडथळे दूर झाले आहेत. या तंत्रांतर्गत एका टाकीत मत्स्यपालन केले जाते.
एरोपोनिक्स पद्धतीने रोपे हवेत वाढतात
विशेष म्हणजे वर्टिकल फार्मिंग मधेही अनेक प्रकारच्या शेती तंत्राचा वापर केला जातो. जसे हायड्रोपोनिक्स, एक्वापोनिक्स आणि एरोपोनिक्स तंत्र. परंतु हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञान शेतकऱ्यांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय आहे. या तंत्रात मातीचा वापर केला जात नाही. माती नसलेल्या मिश्रणात झाडे वाढतात. त्याचप्रमाणे एरोपोनिक्स पद्धतीत हवेत झाडे वाढतात.
संगणक सिंचन
वर्टिकल फार्मिंग मध्ये पाण्याची मोठी बचत होते. यात संगणकाच्या साहाय्याने झाडांचे सिंचन केले जाते. संगणक सिंचन व्यवस्थेवर नियंत्रण ठेवतो. विशेष म्हणजे झाडांचा थोडा विकास झाल्यानंतरच भिंतींवर झाडे लावली जातात.