कांदा दारात वाढ पण कांद्याचे दर कमीच का ?
या हंगामात देशातील बाजारात कांद्याचे दर पडले. त्यामुळे भारतीय कांदा आंतरराष्ट्रीय बाजारात स्वस्त झाला. आंतरराष्ट्रीय बाजारात कांद्याला मागणी होती, त्यामुळे कांद्याची निर्यात वाढली. यंदा कांद्याची निर्यात गेल्यावर्षीपेक्षा ६४ टक्क्यांनी वाढली. तर निर्यातीचे मुल्य केवळ २२ टक्क्यांनी वाढले आहे.भारतातून कांदा निर्यात चालू हंगामात ६४ टक्क्यांनी वाढली. २०२२-२३ च्या हंगामात भारताने २५ लाख २५ हजार टनांची निर्यात केली. आंतरराष्ट्रीय बाजारातील वाढलेली मागणी आणि देशात वाढलेला पुरवठा यामुळे कांदा निर्यात गेल्या सहा वर्षांतील उचांकी पातळीवर पोचली.
कांदा निर्यातीचे मुल्य २२ टक्क्यांनी वाढले आहे. बांगलादेश, संयुक्त अरब अमिराती आणि श्रीलंकेची खरेदी वाढल्याने देशातून यंदा कांदा निर्यात वाढली आहे.बांगलादेश भारतीय कांद्याचा सर्वात मोठा ग्राहक ठरला. बांगलादेशने ६ लाख ७० हजार टनांची आयात केली. तर संयुक्त अरब अमिरातीने ४ लाख टन कांदा खेरदी केला. मलेशियाने जवळपास ४ लाख टन आणि श्रीलंकेने अडीच लाख टनांची खेरदी केली आहे.
हाॅर्टीकल्चर प्रोड्यूस एक्सपोर्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष अजित शाह यांनी बिझनेस लाईनला दिलेल्या माहितीनुसार, आंतरराष्ट्रीय बाजारात मागील काही महिन्यांपासून स्पर्धा नव्हती. त्यामुळे भारतातून कांदा निर्यात वाढली.
पण काही देशांनी भारतीय कांद्याला परवानगी दिली नाही त्यामुळे वाढेल्या मागणीचा भारताला पूर्ण फायदा घेता आला नाही. फिलिपिन्ससारख्या देशांनी चीनच्या कांद्यालाच पसंती दिली.
यंदा कांदा निर्यातीसाठी स्थिती अनुकूल आहे. पण पावसाने कांद्याचे नुकसान मोठ्या प्रमाणात केले. कांदा मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. पण गुणवत्तेचा कांदा कमी प्रमाणात उपलब्ध आहे. पावसाचा फटका बसलेला आणि कमी गुणवत्तेचा कांदा जास्त प्रमाणात असल्याने दर पडल्याचेही व्यापारी सांगत आहेत. यापैकी किती कांदा निर्यात होतो, हे पाहवं लागेल.देशातील कांदा उत्पादनात यंदा मोठी वाढ झाली. पण यापैकी किती कांदा एक महिन्यानंतर चांगल्या स्थितीत राहू शकतो, हे पाहावे लागेल. कारण कांद्याला एप्रिल आणि मे महिन्यातील अवकाळी पाऊस आणि वाढत्या उन्हाचा फटका बसत आहे.
कांद्याचे भाव कमी असल्याने निर्यात चांगली राहू शकते. सध्या कांद्याला प्रतिक्विंटल सरासरी ७०० ते १ हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. बाजारातील आवकेचा दबाव आणखी काही दिवसा राहील. त्यामुळे दरपातळीत काहीसे चढ उतार राहू शकतात, असा अंदाजही निर्यातदारांनी व्यक्त केला.
आता पाकिस्तानमधील नवे कांदा पीक बाजारात येत आहे. पाकिस्तानमधील बलोचिस्तान कांद्याचा मुख्य उत्पादक भाग आहे. पाकिस्तानचा कांदा आंतरराष्ट्रीय बाजारात आल्यानंतर भारतीय कांद्याला काहीशी स्पर्धा निर्माण होऊ शकते. पाकिस्तानचा रुपया डाॅलरचा तुलनेत खूपच कुमकुवत झाला. याचा फायदा पाकिस्तानमधील निर्यातदारांना होऊ शकतो.