कांद्याची खरेदी भाव पाडण्यासाठी नव्हे तर - नाफेडच्या खरेदीवर केंद्रीय मंत्री भारती पवार यांचे स्पष्टीकरण
NAFED Onion Sales : टोमॅटोच्या माध्यमातून कांद्याचे भाव नियंत्रित ठेवण्यासाठी सरकारने हस्तक्षेत्र करण्यास सुरुवात केली. दरम्यान, कांदा बाजारात आणून शेतकऱ्यांच्या कांद्याचे भाव पाडण्याचे प्रयत्न सुरू केल्याची चर्चा रंगत असताना केंद्रीय मंत्री भारती पवार यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे.
पवार म्हणाल्या, नेपाळमधून आयात केलेला आणि नाफेडच्या स्टाॅकमधील कांदा महाराष्ट्रामध्ये कांदा विक्री केला जाणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या कांद्याचे भाव पाडणार नसल्याचे सांगितले. .
मागील दोन महिन्यांपासून देशात टोमॅटोच्या वाढलेल्या किमतींमुळे लोकांच्या जेवणाची चवच बिघडली आहे, त्यानंतर आता कांद्याचे भाव वाढल्याने अनेकांच्या डोळ्यात पाणी येऊ लागले आहे. मात्र, दुसरीकडे टोमॅटो आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या खिशात चांगले पैसे मिळू लागले आहेत. गेल्या आठवड्यात बाजारात कांदा 20 ते 25 रुपये दराने विकला जात होता. आता हे कांदे 30 ते 35 रुपयांनी विकायला सुरुवात झाली आहे. त्यात आता टोमॅटो आणि कांद्याचे दर नियंत्रणात आणण्यासाठी नेपाळमधून कांदा आयात केला जात आहे. तसेच नाफेडच्या माध्यमातून बफर स्टाॅकचा कांदा बाजार आणला जात आहे.
भारती पवार म्हणाल्या, केंद्र सरकारने यावर्षी ‘नाफेड’ व भारतीय राष्ट्रीय ग्राहक सहकारी संघ (एनसीसीएफ)च्या माध्यमातून ३ लाख टन कांदा खरेदी करून बफर साठा केला होता. कांद्याचे भाव नियंत्रित ठेवण्यासाठी नाफेडच्या माध्यमातून देशांतर्गत बाजारपेठेत कांदा विक्री करण्यात येणार आहे.
नाफेडच्या माध्यमातून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांकडून कांद्याची खरेदी होणार आहे पण विक्री होणार नाही. तसेच महाराष्ट्रातील कांदा इतर राज्यांमध्येही विकता येणार आहे. ज्या राज्यांमध्ये कांद्याची आवक घटली आहे. तेच राज्य नेपाळमधून कांदा आयात करू शकणार आहेत. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात कांदा शिल्लक असल्याने नेपाळमधून आयात केलेला कांदा महाराष्ट्रातील बाजारपेठ येणार नाही. त्यामुळे कांद्याचा भाव पडणार असं बोललं जातंय पण हे सर्व चुकीचं आहे" असं मत भारती पवार यांनी व्यक्त केले आहे.