तूर डाळ १६०,उडीद ११५, मूगडाळ १०० रुपये किलो डाळी कडाडल्या; दर आणखी वाढण्याची चिन्हे
मुंबई APMC होलसेल धान्य मार्केटमध्ये कडधान्याचे   भाव गगनाला भिडले असून तूर डाळ १६०, उडीद ११५ तर मूगडाळ १०० रुपये किलो दराने विक्री केली जात आहे. मागील आठवड्यात डाळींच्या किमतीत प्रतिकिलो दहा ते वीस रुपयांनी वाढ झाली होती. परतीच्या पावसाने कडधान्याचे मोठे नुकसान झाल्याचे बोलले जात आहे . त्यामुळे मागणीच्या तुलनेत डाळींचा पुरवठा घटला आहे.यंदा डाळ उत्पादनात   घट झाली आहे. त्यामुळे मुंबई APMC धान्य मार्केट होलसेल बाजारात   दरवाढ सुरू असतानाच दुसरीकडे साठेबाजही सक्रिय झाले आहेत ,त्यानुसार आता साठेबाजी रोखण्यासाठी केंद्र सरकारने साठ्यावर मर्यादा आणल्या पाहिजेत, तसेच केंद्र व राज्य सरकार विशेष समिती स्थापन करून वाढलेल्या डाळीचे दर नियंत्रण कसे करणार   यावर लक्ष्य देणे महत्वाचे आहे,नाही तर येणाऱ्या काळात तूर डाळ २०० तर बाकी सर्व डाळीचे दर १०० रुपये किलो वर जाण्याची   शक्यता वर्तवली जात आहे.
महाराष्ट्रात मराठवाडा व विदर्भात मोठ्या प्रमाणात कडधान्ये घेतली जातात. तसेच राजस्थान व मध्य प्रदेश या राज्यांतूनदेखील डाळींचा पुरवठा होतो. मात्र यंदा   पावसाने राज्यात धुमाकूळ घातला. हातातोंडाशी आलेले कडधान्याचे पीक आडवे झाले. डिसेंबरमध्ये नवीन डाळींचे उत्पादन बाजारपेठेत येऊ शकले नाही. त्यामुळे बाजारपेठेत डाळींचा   तुटवडा निर्माण झाला आहे. मागणी वाढली असून पुरवठा घटला आहे. डाळीचे दर नियंत्रणात आण्यासाठी केंद्र सरकारने डाळ आयात केली आहे मात्र ते कमी प्रमाणात होत आहे ,दुसरीकडे डाळीचा साठवणूक करणारे साठेबाज सक्रिय झाले आहे यावर मर्यादा आणल्या पाहिचे ,सध्या मुंबई APMC होलसेल मार्केटमध्ये   तूरडाळ, मूगडाळ, हरभरा डाळ, उडीद आदींच्या किमतींनी प्रतिकिलो ८० ते १६० रुपये झाली आहे.
मुंबई एपीएमसी मध्ये कसे बदलले दराचे चित्र?
गेल्या एक   महिन्यामध्येच डाळींच्या दराच झपाट्याने वाढ होत आहे. एक   महिन्यापूर्वी मुंबई APMC होलसेल धान्य मार्केटमध्ये   ९० ते ११० रुपये किलो तूर डाळीचा दर होता. आता हेच दर १२० ते १६० रुपये किलोवर येऊन ठेपले आहेत. तर   उडीदडाळ ९० ते १०२ रुपये होती,आता ११० ते ११५ आहे ,तर मूगडाळ ८० ते ९०,चणा डाळ ५५ रुपये होती, आता ८० रुपये ,हिरवा वटाणा ५५ रुपये किलो होता आता ९० रुपये किलोने विक्री होत आहे .   अशा प्रकारे होलसेल मार्केटमध्ये सर्व डाळीचे भाव ८०   ते १२० रुपये किलो दराने विक्री होत आहे. अनेक दुकानदारांची भिस्त ही डाळींच्या जुन्या स्टॉकवरच आहे. एकाएकी दर वाढल्याने ग्राहकांना जादा पैसे मोजून डाळी खरेदी कराव्या लागत आहेत. पुढील काळात डाळींच्या किमतीत आणखी वाढ झाल्यास सर्वसामान्यांच्या ताटातून डाळ गायब होण्याची चिन्हे आहेत. डाळीचे नवीन पीक बाजारात येईपर्यंत दर कमी होण्याची चिन्हे नसल्याची शक्यता व्यापार्यांनी वर्तवली आहे.
मुंबई APMC होलसेल मार्केटमध्ये डाळींचे भाव रुपये
तूरडाळ- १२० - १६०
मूगडाळ- ८५ – ९०
उडीद- ११०-११५
मसूर -७० ते ७५
चणाडाळ -७० ते ८० 
हिरवा वाटाणा -८५ -९०
महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश या राज्यांमध्ये कडधान्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. यंदा   पावसाने कडधान्य पिकांचे नुकसान झाल्याचे बोलले जात आहे . त्यामुळे चालू हंगामात डाळींचे नवीन पीक बाजारपेठेत येऊ शकले नाही. केंद्र सरकारने इतर देशातून डाळी आयात केल्या आहेत, मात्र मागणीपेक्षा आयात   कमी होत असल्याने दरात वाढ झाली आहे ,त्यामुळे आयात वाढावी आणि स्टॉक लिमिटवर नियंत्रण करावे, ज्यामुळे डाळींचे चढे दर कमी होतील.