Apmc फळ मार्क़ेट संचालक म्हणतात हापूस आंबे झाले स्वस्त - मात्र मार्क़ेटमधे कर्नाटकीच आंबे
नवी मुंबई : अक्षय तृतीयेपासून आंब्यांचा सिझन चालू होतो प्रत्येक खवय्याला आंबा हा प्रिय असतो. पण यंदा अवकाळी पावसामुळे आब्यांचे उत्पादन घटले. त्यामुळे बाजारात आंबा तुलनेने कमीच होता. त्यातही कोकणातील हापूस आंब्याचे उत्पादन १७ ते १८ टक्क्यांवर आले. या आंब्याचे दर एक हजार रुपये डझनच्या घरात गेले होते. हापूस कमी प्रमाणात असल्याने, त्याला पर्याय म्हणून हापूससारख्या दिसणाऱ्या कर्नाटकी आंब्यांकडे ग्राहकांनी मोर्चा वळविला. आंब्यांचा सिझन आता संपण्याच्या मार्गवर आहे म्हणूनच आता सर्व सामान्यना परवडतील असे दर करण्यात आले आहेत असे मार्केट संचालक सांगतात पण हापूस आंब्याच्या नावाखाली हापूस सारखा दिसणारा कर्नाटकी आंब्यांने मार्केट काबीज केलं आहे. आंब्यांचे दर कमी झाले असले तरी हि नक्की ग्राहकांना हवा तोच आंबा त्यांना मिळतोय कि अजूनही ग्राहकांच्या चवीला फक्त कर्नाटकीच आंबा मिळतोय कि हा प्रश्न अनुत्तरीतच आहे. आंब्यांवर विविध औषधांची फवारणी केली जाते तरी अन्न व औषध प्रशासन सतर्कतेने काम करताना दिसत नाहीयेत. अजूनही आंब्यांमुळे   ग्राहकांचा जीव धोक्यात आहे का ? आता तरी ग्राहकांना अस्सल हापूस आंबा चाखायला मिळेल का असा प्रश्न निर्माण झाला आहे.
मुंबई apmc मार्केट मध्ये आत प्रवेश केल्यावर तुम्हाला पाहायला मिळेल संपूर्ण विंग मध्ये कर्नाटकी आंबा भरलेला आहे. आंब्यांची अदलाबदल करून हापूस च्या लाकडी पेटित कर्नाटकी आंबा भरला जातो. काही दिवसांपूर्वी apmc न्यूज डिजिटल ने आंब्यांचा चालेला गैरव्यापार उघडकीस आणला होता यावर अन्न   व औषध प्रशासनाने कारवाई देखील केली होती परंतु अजून हि ग्राहकांची फसवणूक चालू आहे. हापूस च्या नावाखाली कर्नाटकी आंबा हापूस च्या दराने विकला जातोय. हापूस आंबा - ५०० ते १००० रु. डझन   ,   कर्नाटक आंबे ५० रु ते १०० रु. किलो   , बदामी ३० ते ८० रु. किलो   , लालबाग - ३० ते ५० रु. किलो,केसर - ५० ते १०० रु. किलो , तोतापुरी - ३० ते ६० रु. किलो   दर कमी झाले तरीही ग्राहकांची फसवणूक सुरूच आहे.