APMCचा संचालक झालं की सात पिढ्यांचं कल्याण! – बाजार समित्यांतील दलालशाहीवर पावसाळी अधिवेशनात खोत यांचा घणाघात!

“APMCचा संचालक झालं की सात पिढ्यांचं कल्याण!” – बाजार समित्यांतील दलालशाहीवर पावसाळी अधिवेशनात खोत यांचा घणाघात!
-आमदार नाही झालं तरी चालेल, पण मुंबई-पुणे बाजार समितीचा संचालक झालं की सात पिढ्यांचं कल्याण!
-शेतकऱ्यांच्या हक्कांची बाजार समित्यांमध्ये धर्मशाळा विधान परिषदेत गैरव्यवस्थेवर संताप
मुंबई ,एपीएमसी न्यूज नेटवर्क : 
“एखादा आमदार झाला नाही, तरी चालेल. पण जर पुणे किंवा मुंबई बाजार समितीमध्ये संचालक पद मिळालं, तर सात पिढ्यांचं कल्याण झालं समजा!” हे विधान आता विनोद न राहता राजकीय आणि व्यापारी वर्तुळातील कटू सत्य बनले आहे.
राज्यातील मुख्य बाजारपेठा मुंबई व पुणे बाजार समित्या शेतकऱ्यांच्या नावावर स्थापन झाल्या, पण आज संचालक मंडळाच्या पूर्ण हस्तखेपमुळे बाजार समिती बोगस अडत्या आणि दलालांच्या ताब्यात गेल्या आहेत. संचालक पद आर्थिक सत्ता, लाभाचे साधन बनले असून, यासाठी रस्सीखेच सुरू आहे.
पावसाळी अधिवेशनात विधान परिषद सदस्य सदाभाऊ खोत यांनी बाजार समित्यांमधील गैरकारभाराबाबत जोरदार लक्षवेधी सूचना मांडली. शेतकऱ्यांच्या हक्कांचा होणारा अपमान, बाजार समितीमध्ये संचालक व दलालांचा वाढता प्रभाव, गाळ्यांचे बेकायदेशीर भाडेपट्टी व्यवहार, अतिक्रमण व निविदांतील भ्रष्टाचार याबाबत त्यांनी सरकारला जाब विचारला.
यावर उत्तर देताना पणन मंत्री जयकुमार रावल यांनी कबूल केले की, अनेक तक्रारी प्राप्त झाल्या असून, संबंधित सर्व प्रकरणांवर चौकशी लावण्यात आली आहे. काही स्टॉल धारकावर   कारवाईही झाली असून, तक्रारींतील संशयास्पद निविदा रद्द करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.
बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांचे शेतमालाला हमीभाव मिळत नाही .बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांची लिलावगृहात बेकायदेशीर पणे कब्जा करण्यात आली आहे .त्यामुळे मुंबई आणि पुणे बाजार समितीमध्ये शेतकरी आपल्या शेतमाल घेऊन येत नाही .शेतकरी हमीभावाच्या प्रतिक्षेत असताना, गाळेधारक व्यापाऱ्यांनी व्यापाराच्या नावावर बेकायदेशीर भाडेपट्टी करून संपूर्ण बाजारपेठ दलालीच्या जाळ्यात अडकवली आहे. गाळ्यांमध्ये चार-पाच दलाल बसवले जातात, आणि त्या जागांमध्ये अनधिकृत वास्तव्य व वसुलीचा साखळी व्यवहार सुरू आहे.सर्वात जास्त मुंबई एपीएमसी भाजीपला आणि फळ मार्केटमध्ये सुरू आहे .
बाजार आवारत रस्ते, पॅसेज, पादचारी मार्ग हे अनधिकृत स्टॉल्स, खाद्य विक्रेत्यांच्या ताब्यात गेले आहेत. फळ व भाजीपाला मार्केट हे धर्मशाळेसारखं वाटायला लागलं आहे — “आओ जाओ, घर तुम्हारा” अशा परिस्थितीत शेतकऱ्यांची वाटच चुकली आहे.
सदाभाऊ खोत यांनी स्पष्ट शब्दांत विचारले – ‘बाजार समित्या शेतकऱ्यांसाठी आहेत की दलालांच्या मालकीच्या जागा झाल्या आहेत?’ यावर पणन मंत्री गांभीर्याने घेण्याची गरजेचे आहे .