कमाई चाराणे आणि खर्च बाराणे!; मुंबई APMC संचालंकाची‘ कोटींच्या कामांना मान्यता
Mumbai Apmc News Update : विधानसभा आचार संहिता लागण्यापूर्वी मुंबई Apmc संचालक मंडळाकडून बैठका घेऊन अनावश्यक विकास कामाची मंजुरी घेण्यात येत आहे . ज्या प्रमाणे अनावश्यक कामाची मंजुरीसाठी संचालक मंडळ धावपळ करत आहे या खर्चासाठी पैसे येणार कुठून ही बाब बिसरल्याचे दिसून येत आहे . एकीकडे उत्पन्न वाढीसाठी सचिव डॉ. पी .एल खंडगले आपल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना बैठक घेऊन मार्गदर्शन करत आहे तर दुसरी कडे उत्पन्न कशी वाढणार याकडे बैठक न लावता अनावश्यक कामाची मंजुरी केला जात आहे .या मधे मार्केटच्या नियोजनशून अभियंताला   हाताशी धरून काही संचालकांनी बाजार समितीच्या तोजोरीवर डल्ला मारण्याची काम जोरात सुरू केल्याची चर्चा सुरू आहे .त्यामुळे ”याला म्हणतात कमाई चाराणे आणि खर्च बारणे,! जेवढा निधी आहे   तेवढ्याच रकमेची कामे मंजूर करणे हा नियम आहे. बाजार समितीच्या तिजोरीमध्ये ६० कोटी रुपये शिल्लक असताना जवळपास ७०   कोटीच्या कामे काढण्यात आली आहे .गरज नसताना नियोजन शून्य अभियंताकडून मागील ५ वर्षापासून जवळपास १५० कोटी रुपयांची प्रकल्प बांधून सध्या धुळखात पडले आहेत .गरज नसताना काही संचालक व अभियंताने आपल्या फायदासाठी ३० कोटी रुपया खर्च करून बांधण्यात आलेल्या कोल्ड स्टोरेज जे सध्या ऑपरेशन बिना पडून धुळखात आहे त्यावर सुद्धा त्याच कंत्राटदारान दुरुस्तीसाठी १ कोटी रुपये मंजुरी करण्यात आली आहे .असे विविध प्रकल्प आहे हे पाडून राहिलेले आहे .
 
मुंबई APMC काळजीबहू सभापती पणन मंत्र्यांना खुश करण्यासाठी ६ वर्ष पूर्वी मार्केट मधे झालेल्या रस्ते ,गटार लाईनच्या निकृष्ट दर्जाचे कामाची चौकशी न करता परत जवळपास ७० कोटीच्या कामाची निवडणुकी आचार   संहिता पूर्वी मंजुरी करण्यात आल्याची चर्चा बाजार आवारात सुरू अहे .आता जे काम ठेकेदाराकडून धान्य आणि मसाला मार्केटमधे होत आहे ते सुद्धा थुकपट्टी काम करण्यात येत अहे .मंत्र्याना आणि मंत्र्याचे नवीन संचालकाला खुश करण्यासाठी आणि आपला काळजीबाहू सभापती पद टिकण्यासाठी कोटींच्या नव्या/जुन्या कामांना मंजुरी देण्याचा प्रताप संचालक मंडळ   करते आहे! मुंबई Apmc दिवाळखोरीत तेव्हा निघते, जेव्हा संचालकांची   बुद्धी दिवाळखोरीच्या मार्गावर असते किंवा त्याला लपूटपणाचा वास असतो .मुंबई APMC दिवाळखोरीच्या मार्गावर मार्गस्थ होऊ नये म्हणून अधिकारी व कर्मचारी संगठनाने तातडीने पाऊले उचलावीत, ही मागणी बाजार घटक करीत आहे !