मुंबई APMC होलसेल भाजीपाला मार्केटमध्ये खोट्या बाजारभावामुळे शेतकऱ्यांची फसवणूक
 
- मुंबई APMC घाऊक भाजीपाला मार्केटमध्ये शेतमालाची दरात तफावत
- मुंबई APMC भाजीपाला मार्केटमध्ये शेतकर्यांची लूट सुरूच
- APMC प्रशासनातर्फे भाजीपाल्याचे दरपत्रक प्रसिद्ध करण्यात येते जवळपास ९० टक्के तफावत
Mumbai Apmc Market Price News: एकीकडे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतात की आमच सरकार हे शेतकऱ्यांच सरकार आहे. मात्र शेतकऱ्यांसाठी असलेल्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील घाऊक   भाजीपाला मार्केटमध्ये शेतकर्यांची लूट सुरूच असल्याचे दिसून येत आहे .
मुंबई एपीएमसी घाऊक बाजार आवारात भाजीपाल्याला दोन दर आकारले जात असल्याने ग्राहकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. शिवाय बाजार समिती प्रशासन प्रसिद्ध करत असलेले दर आणि मुळात बाजार आवारात असलेले दर यात तफावत असल्याचे समोर आले आहे. भाजीपाला मार्केटमध्ये आज जवळपास ५९० गाड्यांची आवक झाली असून घाऊक बाजारात प्रत्येक भाज्यांची दर २० ते ८० रुपये किलो विक्री केली जात आहे. मात्र याच मार्केटमधील डी व सी पाकळीमध्ये दुप्पट आणि तिप्पट दराने भाजीपाला विक्री केली जात आहे. त्यामुळे मुंबई आणि उपनगरमध्ये ग्राहकांना 100 रुपये किलो दराने भाजीपाला खरीदी करायला लागत आहे.
शेतकऱ्यांना मातीमोल भाव देणारे व्यापारी आणि ग्राहकांना मात्र अधिक पटीने भाजीपाला विकत घ्यावे लागत असल्याचे स्पष्ट झाले आहे. एकीकडे शेतकरी उध्वस्थ होत चालला आहे, तर दुसरीकडे सामान्य ग्राहक महागाईने बेजार झाला आहे. त्यामुळे मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये शेतकरी आणि ग्राहकांमध्ये ही निर्माण झालेली लॉबी कोणाच्या आशीर्वादाने हे काम करते असा सवाल केला जात आहे. तर बाजार समिती प्रशासन यावर गप्प का? तर बाजार समितीवर निवडून आलेले शेतकरी प्रतिनिधी नक्की काय करत आहेत असा सवाल देखील विचारला जात आहे.
मुंबई APMC प्रशासन मार्फत   दैनंदिन सर्व भाजीपाल्याचे   दराचे पत्रक जाहीर केले जाते. मात्र प्रत्यक्षात मार्केटमधील भाज्यांचे दर आणि प्रशासनाने जाहीर केलेले   दर या मध्ये मोठ्या प्रमाणत तफावत असल्याचे दिसून येत आहे.आज दिनांक ९ जानेवारी २०२३ रोजी APMC NEWS डिजिटल यांनी   बाजार आवारात करण्यात आलेल्या खरेदी-विक्रीच्या सर्वेक्षणातून शेतकरी ते ग्राहक दरातील तफावत समोर आली आहे   ..  
बाजारसमिती प्रशासनाकडून   ९ जानेवारी २०२४ रोजी देण्यात आलेल्या दर पत्रकात भुईमूग शेग ७०   ते ८० रुपये तर मात्र मार्केटमध्ये १२० रुपये किलो ,लिंबू -१४ रुपये तर मार्केटमध्ये ४० रुपये प्रतिकिलो, अरबी-५६ रुपये मात्र मार्केटमध्ये १०० रुपये प्रतिकिलो,भेडी - 60-प्रतिकिलो 
भोपळा - 40-प्रतिकिलो ,दुधी - 40-प्रतिकिलो ,चवळी (शेंग)- 50-प्रतिकिलो ,ढेमसे- 70-प्रतिकिलो ,फरसबी- 40-प्रतिकिलो, फ्लॉवर- 50-प्रतिकिलो, गाजर- 40-प्रतिकिलो, गवार- 60-प्रतिकिलो, घेवडा- 50-प्रतिकिलो हि सर्व भाज्यांचे दरामध्ये तफावत आहे ,आज आम्ही प्रत्यक्ष तुम्हाला जे मार्केटमध्ये बाजारभाव आहे ते प्रसिद्ध केले आहे ,मात्र APMC प्रशासनाने जे दरपत्रक प्रसिद्ध करतात यामध्ये जवळपास ९० टक्के   भाजीपाल्याचे दरात तफावत आहे ,तसेच काही भाजीपाल्याचे दर प्रसिद्धी केला जात नाही यामागे कोण ? या दाराच्या तफावत मध्ये कुणाला फायदा होतो?   याकडे पणन संचालक व सचिव याकडे लक्ष्य दियाला गरजेचे आहे .
नेमकं प्रकरण काय?
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्याला हमीभाव मिळत नाहीय. शेतकऱ्याने पाठवलेल्या शेतमालाची लाखो रुपये थकबाकी वर्षानुवर्षे व्यापारी ठेवत आहेत. पैशांसाठी शेतकरी फक्त हेलपाटे घालताना दिसत आहेत. बाजार समितीला योग्य सेस सुद्धा मिळत नाही.
शेतकरी ते ग्राहक दरातील तफावत
मुंबई एपीएमसी भाजीपाला घाऊक बाजारात सध्या जवळपास 600 गाड्यांची आवक होत आहे. बाजार आवारात करण्यात आलेल्या खरेदी-विक्रीच्या सर्वेक्षणातून शेतकरी ते ग्राहक दरातील तफावत प्रकर्षाने समोर आली आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती ही आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ आहे. या बाजारसमितीमध्ये घाऊक भाजीपाला मार्केट आहे. घाऊक बाजारात चार पाकळ्या आहेत. प्रत्येक विंग मध्ये व्यापार   करणाऱ्या व्यपाऱ्याकडून मापाडी व निरीक्षक शेतमालाचा योग्य बाजारभाव दलाला कडून घेऊन   दाराचे पत्रक जाहीर करणे ही त्यांची जबाबदारी आहेत ,   मात्र उपसचिव आणि कर्मचाऱ्यांच्या भोंगळ कारभारामुळे अंदाजे दर पत्रक बनवले जात आहे.
एकाच मार्केटमध्ये दुप्पट दरात भाजीपाला विक्री
या मार्केटमध्ये जवळपास 80 टक्के व्यापाऱ्यांनी व्यापार न करता आपले गाळे भाड्याने दिले आहेत. एका गाळ्यामध्ये 4 ते 5 जण व्यापार करतात. सध्या घाऊक बाजार आवारात दोन विभाग झाले आहेत. डी विंगमध्ये पूर्णपणे किरकोळ दरात भाज्या विकल्या जात आहेत. डी पाकळीमध्ये भाजीपाल्याची ४० ते १२० रुपये प्रतिकिलो दराने विक्री होत आहे. तर इतर पाकळीमध्ये २० ते ८०   रुपये किलो भावाने भाजीपाला विकला जात आहे. अशाप्रकारे सध्या एकाच मार्केटमध्ये दुप्पट दराने भाजीपाला विक्री केला जात आहे. यावर नियंत्रण येणे गरजेचे आहे. त्यासाठी राष्ट्रीय स्वाभिमान संघटनाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन पुजारी   यांनी सांगितले की, व्यापारी व्यापाऱ्याच्या हिताचे काम करणार शेतकऱ्यांसाठी नाही. या घाऊक बाजारात दोन दराने विक्री केल्याने मार्केटमधून जाणाऱ्या भाजीपाला उपनगराला चार पट भावाने विक्री केला जातो. त्यामुळे शेतकरी आणि ग्राहकाला मोठा नुकसान होते. यासाठी राज्याचे मुखमंत्री आणि पणन मंत्री लक्ष्य द्यायला पाहिचे नाही तर शेतकरी, ग्राहक कंगाल तर मुंबई एपीएमसी व्यापारी मालामाल होणार.
शेतकरी आणि ग्राहकांचं नुकसान
घाऊक बाजारात कमी दराने मालाची विक्री केली जाते. मात्र, त्याच ठिकाणी किरकोळ मार्केटमध्ये दुप्पट भावाने माल विकला जातो. एकीकडे कमी किंमतीला विकला जाणारा माल तर दुसरीकडे मात्र हाच माल दुप्पट किंमतीच्या भावाने विकला जातो. त्यामुळे APMC मार्केटमध्ये भाजीपाल्याचे एकच मार्केट असून जागेच्या भाड्याच्या किंमतींमुळे व्यापारी भाज्यांचे भाव वाढवत आहेत. त्यामुळे त्याचा परिणाम शेतकऱ्यांवर आणि ग्राहकांवर झालेला दिसून येत आहे.
व्यापाऱ्यांची नेमकी भूमिका काय?
या बाबतीत बाजारात काही व्यापाऱ्यांना विचारपूस केली असता व्यापाऱ्यांनी सांगितले की, बाजार समितीमध्ये संचालकांनी डी पाकळीमधील भाजीपाला किरकोळ भावात विकण्यासाठी सूट दिली आहे. शिवाय या व्यापाऱ्यांकडून बाजार समितीचा नाममात्र सेस भरणा होत आहे . त्यामुळे प्रतिदिन जवळपास सरासरी 600 गाड्यांची आवक होऊन देखील बाजार समितीकडे ४० टक्के सेस जमा होत आहे. त्यामुळे मार्केट संचालकांनी ठराविक व्यापारी ,उप सचिव व सुरक्षा अधिकाऱ्यांना   घेऊन बाजार समितीमधून शेतकऱ्यांना   संपण्याच्या मागे असल्याचे निदर्शनास येत आहे. यावर पणन मंत्री ,पणन संचालक आणि मार्केट सचिव काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
APMC NEWS डिजिटलने बाजार आवारात करण्यात आलेल्या खरेदी-विक्रीच्या सर्वेक्षणातून शेतकरी ते ग्राहक दरातील तफावत समोर . सर्व बाजारभाव प्रतिकिलो खालील प्रमाणे -09/01/2024
भुईमूग शेग - 120 प्रतिकिलो        
लिंबू - 40-प्रतिकिलो 
आले - 100 -प्रतिकिलो 
अरबी- 100-प्रतिकिलो 
भेडी - 60-प्रतिकिलो 
भोपळा - 40-प्रतिकिलो 
दुधी - 40-प्रतिकिलो 
चवळी (शेंग)- 50-प्रतिकिलो 
ढेमसे- 70-प्रतिकिलो 
फरसबी- 40-प्रतिकिलो 
फ्लॉवर- 50-प्रतिकिलो 
गाजर- 40-प्रतिकिलो 
गवार- 60-प्रतिकिलो 
घेवडा- 50-प्रतिकिलो 
कैरी- 160-प्रतिकिलो 
काकडी - 24-प्रतिकिलो 
कारली-50 -प्रतिकिलो 
केळी -   60 -प्रतिकिलो 
कोबी- 20 -प्रतिकिलो 
कोहळा- 30-प्रतिकिलो 
मिरची (ढोबळी)-प्रतिकिलो 
पडवळ-40-50-प्रतिकिलो 
परवर-60-प्रतिकिलो 
फणस- 60-प्रतिकिलो 
रताळी- 40-50-प्रतिकिलो 
शेवगा शेग - 60 -प्रतिकिलो 
दोडका - 40-प्रतिकिलो 
सुरण - 60-प्रतिकिलो 
टोमॅटो- 10-25-प्रतिकिलो 
तोंडली - 50-प्रतिकिलो 
वाटाणा- 40-प्रतिकिलो  
बांगी काटेरी - 60-प्रतिकिलो  
बांगी काळी- 40-प्रतिकिलो 
मिरची ज्वाला - 40-प्रतिकिलो 
मिरची लवंगी - 60-प्रतिकिलो 
कढीपत्ता- 40-प्रतिकिलो 
कांदापात - 10-प्रतिकिलो  
कोथंबीर - 20-प्रतिकिलो 
मेथी - 15-प्रतिकिलो 
मुळा - 30-प्रतिकिलो 
पालक - 20-प्रतिकिलो 
पुदिना -10-प्रतिकिलो