मुंबई APMC मार्केटच्या पुनर्विकासात गणेश नाईकांची एंट्री
-मुंबई APMC मार्केटच्या धोकादायक   इमारतीवर अद्याप तोडगा नाही
-अघटित घटनेला जबाबदार कोण राहणार ??
-कोट्यवधींचा व्यवसाय धोक्याच्या छत्रछायेखाली
-मार्केट संचालक व कार्यकारी अभियंताच्या भोंगळ कारभारामुळे पुनर्विकास रखडली
-पुनर्विकासच्या नावाखाली दोन्ही पक्ष्यामध्ये चढाओढ सुरु झाल्याची दिसायला मिळाली मात्र कार्यालय धारक रस्त्यावर
नवी मुंबई : मुंबई APMC   च्या धोकादायक इमारती च्या पुनर्वसना करण्याची शाशवती संचालक मंडळाकडून आमदार , खासदार , मंत्रीनि देऊन सगळ्यांचे प्रयत्न करून झाले. ३५ वर्षापूर्वी बांधण्यात आलेल्या मार्केटची इमारत महापालिकेकडून   अतिधोकादायक घोषित करण्यात आली आहे.
अनेक नेत्यांनी   पाहणी केली पण तरीही यावर अजूनही तोडगा नाहीच. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये पाच मार्केट आहेत, या पाच मार्केट मध्ये कांदा-बटाटा व मसाला मार्केट मध्ये प्रत्येकी कांदा बटाटा मार्केट मध्ये - २२५ तर मसाला मार्केट मध्ये २७२ असे एकुण ४९७ गाळे आहेत . ज्या गाळ्यांध्ये रोज कोट्यवधींचा   व्यवहार होतो. पण हे सर्व गाळे अतिशय धोकादायक आहेत असे नवी मुंबई महानगरपालिकेने आपल्या अहवालात म्हटले आहे. दरवर्षी   पावसाळ्यात कार्यालय आणि गाळे   धारकांना नोटीस पाठवण्यात येते. 
तसेच ह्या सर्व इमारती अतिशय धोकादायक आहेत असा   बोर्ड देखील   लावण्यात आला आहे. परंतु काही नेते मंडळी कित्येकवेळा ह्या बाजारसमितीला भेट देतात पण तरीसुद्धा ते ह्या सर्व मुद्यांवर लक्ष देत   नाहीत.या गळ्याधारकणा फक्त आश्वासन दिले जातात. मार्केटचा व्यापार   थांबवून ते तात्काळ खाली करण्याची नोटीसही बजावण्यात आली आहे. या सर्व प्रकरणावर व्यापारी आणि कार्यालयधारक असे म्हणत आहेत की आम्हांला तात्तपुरते दुसरे मार्केट उभारुन द्यावे तरच आम्ही हे मार्केट खाली करु.
अतिधोकादाय ठरवलेल्या इमारतीत जर   अघटीत घटना घडली तर ह्या सर्व घटनेला जबाबदार कोण हा प्रश्न ऐरणीवर येत आहे. तसेच अशीच परिस्थिती मसाला मार्केटची आहे. मसाला मार्केट मध्ये २७२ गाळे आहेत तसेच चार माळ्यांची बिल्डिंग आहे, ह्या सर्व इमारती आणि गाळ्यांची परिस्थिती ही सुद्धा अतिशय बिकट आहे ह्या सर्व इमारती केव्हाही कोसळु शकतात असा अहवाल VJTI ने आपल्या २०१७ च्या स्टकचरल ऑडीट मध्ये दिला होता. 
कांदा-बटाटा आणि मसाला मार्केट त्याच बरोबर प्रशासकीय इमारत ची अवस्था पहायला गेल तर खांबाना गेलेले तडे,   ढासाळेले स्लॅब, जीर्ण बांधकाम ह्या सर्व प्रश्नांनी व्यापारी ,अधिकारी आणि कर्मचारी त्रस्त आहेत.
बुधवारी ७ जून रोजी   सेंट्रल फॅसिलिटी इमारतीचा पुनर्विकास साठी प्रशासकीय इमारतीच्या सभागृहात बैठक पार पडली. या बैठकीत ऐरोली चे आमदार गणेश नाईक , राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे , कार्यवाहू सभापती अशोक डक, सचिव राजेश भुसारी त्याचबरोबर महापालिकेचे अधिकारी , व्यापारी संघटन उपस्थित होते. या बैठकीत इमारतींच्या सुधारणेबाबत सरकार कडून जे काही शक्य होईल ते आपण करू. मार्केट मधील सर्व इमारती एकतर   पुनर्विकास केल्या जातील नाहीतर सुधारणा तरी नक्कीच केले जातील असे गणेश नाईक यांनी म्हंटले.
व्यापारी आणि गळेधारकाचे बाजार समिती प्रशासन कडून कुठल्याही प्रकार सहायता मिळत नसल्याने लाईजाने व्यापारी आणि कार्यालय धारकाने एरोलीच्या आमदार गणेश नाईक कडे साकडे घातले,साहेब आम्हाला बचावा अशी मागणी यावेळी करण्यात आली.
गेल्या वर्षी हि   ह्याच मुद्द्यावर गणेश नाईक यांनी बैठक घेऊन आदेश दिला होता की १५ दिवसात तोडगा काढा मात्र नाईक याव्या आदेशाला मार्केट संचालक व प्रशासनाने केराची टोपली दाखवली. आता त्याच जोशात आमदार गणेश नाईक यांनी मी पुन्हा येईन याप्रमाणे पुनर्विकासात लक्ष घालत आहेत. आता तरी हा पुनर्विकास चा मुद्दा पुढे जाईल का ? इमारतींचा पुनर्विकास कधी या सवालाला जवाब मिळेल का ?   याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.