मुंबई APMC संचालक मंडळ व प्रशासनाने पुनर्बांधणीच्या नावाखाली मंत्र्यांची केली दिशाभूल!
 
-मुंबई APMC कांदा बटाटा मार्केटच्या पुनर्बांधणीचा नावाखाली बिल्डरांच्या घशात घालण्याचा घाट!
पुनर्बांधणीच्या विषयाचा तपशील एकच, परंतु मंत्र्याना वेगवेगळ्या प्रकारचा प्रेझेंटेशन
Mumbai Apmc Development:   आशियातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या मुंबई APMC कांदा बटाटा मार्केटचा   चेहरामोहरा लवकरच बदलणार आहे. गेल्या २० वर्षांपासून कांदा बटाटा मार्केटचा पुनर्विकास रखडलेला होता. आता काही दिवसात तो बिल्डरच्या घशात जाणार असल्याची माहित समोर येत आहे, बुधवारी पणन मंत्री अब्दुल सत्तार यांच्या पाहणी दौऱ्यात कांदा बटाटा मार्केटच्या पुनर्बाधणीचे एकूण बजेट ४४७ कोटी रुपये दाखवण्यात आले आहे, त्यामुळे मागील २० वर्षांपासून कांदा बटाटा मार्केटचा   पुनर्विकास व्हावा ही इच्छा मनी धरून असलेले २७२ व्यापारी   सध्या संभ्रमात असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता मार्केटचा   विकास कधी मार्गी लागतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
मुंबई APMC मधील अतीधोकादायक असलेल्या कांदा - बटाटा मार्केटच्या पुनर्बांधणीचा प्रश्न १०० दिवसामध्ये मार्गी लावणार, व्यापारी व प्रशासन सर्वांना विश्वासात घेऊन पुनर्बांधणीचे काम पूर्ण केले जाईल असे आश्वासन पणनमंत्री अब्दूल सत्तार यांनी बुधवारी पत्रकार परिषदेमध्ये दिले आहे. मात्र आम्ही तुम्हाला सांगणार आहोत कि कांदा-बटाटा मार्केटची पुनर्बांधणी कशाप्रकारे बिल्डरच्या घशात घालण्यासाठी चढाओढ सुरु आहे. कार्यवाहु सभापती व मार्केट अभियंताने एका बिल्डर सोबत मिळून या पुनर्बाधणीसाठी मास्टरप्लॅन तयार केला आहे. पणन मंत्री अब्दुल सत्तार यांच्या मार्केट पाहणी दौऱ्या अगोदर सभागृहाच्या चार भिंती मध्ये कांदा बटाटा मार्केटच्या पुनर्बांधणीचा एक प्रोजेकट रिपोर्ट दाखवण्यात आला, या रिपोर्टला   कांदा बटाटा मार्केट पुनर्बांधणी असे नाव देण्यात आले होते, मात्र कांदा बटाटा मार्केटच्या नावावर मॅफको व लिलावगृहाच्या जागेवर कॉमर्शियल बिल्डिंग ,प्रशासकीय इमारत   दाखवण्यात आली, यामध्ये एकूण खर्च ४४७ कोटी रुपयाचा होता , कांदा बटाटा मार्केटसाठी एकूण खर्च ८४ ते १०० कोटी व प्रशासकीय इमारतीसाठी ३४७ कोटी खर्च दाखवून मंत्र्याची दिशाभूल करण्यात आल्याची चर्चा बाजार आवारात सुरु आहे.
कांदा बटाटा मार्केटला २००९ -१० साली ५५ कोटी रुपयाच्या पुनर्बांधणीच्या कामाला नवी मुंबई महापालिकेची मंजुरी मिळाली, त्यांनतर युनिटी कंस्ट्रक्शन कंपनीला बाजार समितीने काम करायण्यासाठी मंजुरी दिली. त्यानी रस्त्याचे काम सुरु केले ,त्यावेळी बाजार घटकाने जास्त FSI ची मागणी केली, मात्र बाजार समितीने नाकारल्याने काही व्यापारी घटक कोर्टात गेले आणि कामाला स्थगिती मिळाली. कोर्टाने २०१३-१४ मधे सुनावणी करून बाजार समितीला आदेश दिला की धोकादायक जागेवर पुनर्बांधणी करण्यासाठी L शेप मधे कॉमर्शियल कॉम्लेक्स बांधून त्याच्या उत्पनातून पुनर्बांधणी करा. बाजार समितीने ८५ कोटी रुपयांच्या बांधकामाचा प्रस्ताव NMMC कडून मंजूर करून घेतला, त्यानंतर परत काही व्यापारी कोर्टात गेल्याने पुनर्बांधणीचे काम रखडले, त्यानंतर गेली ८ वर्षे बाजार समितीच्या अभियंत्यांनी पूर्ण दुर्लक्ष्य केले ,त्यामुळे सदर पुनर्बांधणीचे प्रकल्प रखडले आहेत ,आता कार्यवाहु सभापती व मार्केट अभियंताने व्यापाऱ्यांच्या जागा बिल्डरच्या घशात टाकण्यासाठी मंत्र्यांना प्रोजेकट रिपोर्ट दाखवले आहेत. आता पणन मंत्री माझ्या जवळचे आहेत मी जे बोलणार, ते करणार त्यासाठी लवकरात लवकर पुनर्बांधणीचा निर्णय घेण्यासाठी हालचाल सुरु झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात APMC मार्केट बिल्डरच्या घशात जाण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे.
त्यानंतर   प्रमाणे कांदा बटाटा मार्केटचे संपूर्ण क्षेत्रफळ L सेप चे क्षेत्रफळ व सिडको कडून खरीदी केलेला माफको प्लॉटचे क्षेत्रफळ, या तिन्ही प्लॉटची एकत्रीकरण करून कांदा बटाटा मार्केट पुनर्बांधणी नावाखाली एकूण ४४७ कोटीच्या कामाचे   प्रोजेक्ट रिपोर्ट बनवण्यात आला आहे, यामध्ये बाजार समितीची प्रशासकिय इमारत १६७ कोटी, लिलावगृहाच्या जागेवर कॉमर्शियल इमारत , मॅफको मार्केटच्या जागेवर कॉमर्शियल इमारत अशी एकूण तिन्ही बांधकामाला ३४७ कोटी रुपये खर्च दाखवण्यात आला आहे , या पूर्वी देखील असेच प्रोजेक्ट दाखवून ३ मंत्र्याना दिशाभूल केली आहे , पूर्वी भाजपचे पणन राज्यमंत्री राम शिंदे , पणन मंत्री सुभाष देशमुख , महाविकास आघाडीचे बाळासाहेब पाटील यांनी कांदा बटाटा मार्केट पुनर्बांधणी संदर्भात दौरे केली व संबंधित व्यापाऱ्यासोबत बैठक घेवून कामाचा लेख जोखा सांगितला , त्यानंतर पुनः महायुतीचे पणनमंत्री अब्दुल सत्तार याना बाजारसमितीच्या अभियंतानी पुनर्बांधणी विषयावर दिशाभूल केल्याचे समजते.