मुंबई एपीएमसी फळमार्केटच्या व्यापाऱ्यांकडून आंबा विक्रीत एफडीए अधिकाऱ्यांची फसवणूक? कर्नाटक आंब्याची देवगड आंबा म्हणून विक्री
 
मुंबई एपीएमसी फळमार्केटच्या व्यापाऱ्यांकडून आंबा विक्रीत एफडीए अधिकाऱ्यांची फसवणूक? कर्नाटक आंब्याची देवगड आंबा म्हणून विक्री
- कोकणातील हापूसच्या आंब्याच्या जागी कर्नाटकमधील हापूस आंबा गळ्यात मारला
- मार्केट संचालक व उप-सचिवांच्या अभद्र युतीमुळे ग्रहकांची होते फसवणूक
- बाजार आवारात मार्केट संचालकांनी हापूसच्या नावाने   कर्नाटक आंब्याची ब्रॅण्डिंग करण्यासाठी दिली परवानगी
- कोकणातील हापूस आंबा शेतकरी, ग्राहक कंगाल मार्केट संचालक, उप सचिव आणि व्यापारी मालामाल!
- कोकणातील हापूस आंबा ८०० ते १००० रुपये डझन आणि कर्नाटक हापूस १०० ते १५० रुपये किलो आहे. जास्त पैसे कमविण्यासाठी बाजार आवारात व्यापाऱ्यांकडून फसवेगिरी केली जात आहे.
नवी मुंबई मुंबई एपीएमसी फळ मार्केट मध्ये कर्नाटक आंब्याची देवगड हापूस म्हणून विक्री केल्याचा प्रकार सोमवारी उघडकीस आला. हा आंबा सामान्य ग्राहकांना नाही तर राज्याचे अन्न औषध प्रशासनाचे अधिकारी यांना देऊन फसवणूक करण्यात आली. मार्केट उप सचिव संबंधित व्यापाऱ्यांवर कुठलीही कारवाई न केल्याचे समजते. त्यामुळे मार्केट संचालक, उप सचिव, भेसळ करणारे व्यापारी मस्त तर, ग्राहक त्रस्त असे चित्र सध्या मार्केटमध्ये पाहायला मिळत आहे. ज्या ज्या वेळी तक्रारी येतात त्यावेळी थातूरमातूर कारवाई केला जाते. उप सचिव म्हणतात आंबा विक्रीत गैरप्रकार आढळल्यास माल जप्तीची कारवाई केली जाणार आहे, मात्र प्रत्यक्षात तसे होत नाही म्हणून बाजार आवारात उघडपणे कोकणच्या हापूस नावाने कर्नाटक आंबा विकला जातोय.
अन्न औषध प्रशासनचे अधिकारी उद्धव भामरे यांनी फळ मार्केटमधून हापूस आंब्याच्या पेट्या घेऊन गेले होते. नंतर तो आंबा कापल्यावर आंबट आहे लक्षात आल्यावर त्या आंब्याची हापूसची चव नसल्याने सदर पेट्या त्यांनी त्या गाळे धारकाकडे घेऊन गेले, आणि पुढे काय घडले पहा या रिपोर्टमध्ये ...
नवी मुंबई एपीएमसी घाऊक फळ बाजारात आता दिवसात २०० ते ३०० गाड्या हापूस आंबा दाखल होत आहे. बाजार आवारात सामान्य ग्राहकाबरोबर आता अन्न औषध प्रशासनाचे अधिकाऱ्यांची सुद्धा फसवणूक होत असल्याचे समोर आले आहे. कोकणातील हापूस आंब्याच्या नावाने कर्नाटकातील हापूस आंब्याची उघडपणे विक्री केली जात आहे. या व्यापाऱ्याने कोकणातील हापूस आंब्याच्या नावाने कर्नाटक आंबा देऊन फसवणूक करण्याची माहिती अन्न औषध प्रशासनचे अधिकारी उद्धव भामरे यांनी दिली आहे .  
मार्केटमध्ये सध्या हापूस आंब्याच्या आवकेत वाढ झाली आहे. दररोज ५० ते ६० हजार पेट्या दाखल होत आहेत. मात्र गेल्या काही वर्षात कोकणातील हापूस आंब्याला कर्नाटकमधील हापूस आंब्याने टक्कर द्यायला सुरवात केली आहे. सध्या एपीएमसीमध्ये १० ते १५ हजार कॅरेट या कर्नाटक हापूस आंब्याच्या पेट्या येत आहेत. बाजार आवारात कर्नाटक हापूस आपल्या गाळ्यावर आणून थपि मारून ठेवला जातो. आणि तिथे छाटणी करून देवगडच्या पेट्यात टाकला जातो. ग्राहकांना विकताना कोकणातील हापूस आंबा असल्याचा दाखवला जातो. प्रथमदर्शनी कोकण आणि कर्नाटक हापूस आंब्यातील फरक पटकन दिसून येत नसल्याने ग्राहकांची फसवणूक होत आहे. बाजार समिती प्रशासनातर्फे सर्व व्यपाऱ्यांना आदेश दिला जातोय मात्र त्याची अंमलबजावणी होत नसल्याने उघडपणे कोकणातील हापूसच्या जागी कर्नाटकमधील हापूस ग्राहकांच्या गळ्यात मारला जात आहे. कोकणातील हापूस डझनावर तर कर्नाटकमधील हापूस किलोवर विकला जात आहे. कोकणातील हापूस आंबा ८०० ते १००० रुपये डझन आणि कर्नाटक हापूस १०० ते १५० रुपये किलो आहे. जास्त पैसे कमविण्यासाठी बाजार आवारात ७० टक्के व्यापाऱ्यांने कोकणातील हापूस आंब्याच्या नावाने कर्नाटक आंब्याची फसवेगिरी करतात. ही सर्व मार्केट संचालक व उप सचिवांच्या देखरेखखाली होत असल्याची चर्चा बाजार आवारात होत आहे .
कोकणातील हापूस आणि कर्नाटकातील हापूसमधील फरक कसा ओळखायचा?
कोकणातील हापूस आंबा - आंब्याची वरची साल पातळ असते. दिसायला गोल असतो. कापल्यावर केसरी रंगाचा दिसतो. कर्नाटकमधील हापूस आंबा - वरची साल जाड असते. दिसायला खालच्या बाजूला निमूळता असतो. कापल्यावर पिवळ्या रंगाचा दिसतो.