Mumbai Apmc : सत्तेच्या घोडेबाजारात मुंबई APMC संचालक मंडळ धुंद - बाजार घटक वाऱ्यावर | Apmc News
Mumbai Apmc Director News : ‘आम्हला व्हेंटिलेटर वरून सुटका करा आणि संचालक मंडळाला अस्तित्वात आणा’,असे साकडे कार्यबाहू सभापती अशोक डक यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारना   घातले (Ashok Dak pray to Ajit Pawar).  
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीवर पुन्हा प्रशासकाची नियुक्ती होण्याची शक्यता असताना आता राज्यात पुन्हा राजकीय भूकंप झाला आहे.   बाजार समितीवर वर्चस्व असलेल्या शरद पवार व अजित पवार यांच्या राजकीय भूमिका बदलल्यामुळे संचालक मंडळ संभ्रमात पडले आहेत. अजित पवार गटाकडून सहकार आणि पणन खाते   शिंदे-फडणवीस सरकारकडे मागण्यात येत आहे तर   दुसरीकडे कार्यवाहू सभापती अशोक डक यांनी काही संचालक सोवत अजित दादा पवार   कडे गेले होते . मुंबई APMCचे संचालक मंडळाला   ६ महिन्यापासून व्हेंटिलेटर वर ठेवलेले मुख्यमंत्री व पणन मंत्री एकनाथ शिंदे कडून लवकरात लवकर   सुटका करा   आणि आम्हाला वाचवा असे साकडे अजित दादाना घातले . सूत्राने सांगितल्याप्रमाणे काही संचालक बाजार समितीच्या आवारत मागील ७ दिवसापासून तळ ठोकून   बसले आहेत.
मुंबई APMC मध्ये   सहा वर्षांच्या प्रशासकीय राजवटीनंतर बाजारसमितीवर २०२० ला   संचालक मंडळ अस्तित्वात आले . यामध्ये   शेतकरी,कर्मचारी, माथाडी कामगारांसह व्यापाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. परंतु या ३ वर्षात संचालक मंडळाच्या भोंगळ कारभारामुळे मार्केटचा   पुनर्बांधणीसह   विकास कामे रखडली आहेत . प्रशासकीय   राजवटीनंतर   संचालक मंडळ अस्तित्वात आले त्याकाळात महाविकास आघाडी सरकारमध्ये उप मुख्यमंत्री अजित पवार आणि पणन मंत्री बाळासाहेब पाटील होते . अजित पवार   यांनी राज्याच्या विकासबरोवर बाजार समितीचा विकास व्हावा यासाठी दर गुरवारी सिडको ,महापलिका मध्ये आढावा बैठक घेत होते त्यावेळी बाजार समितीचे सभापती अशोक डक ,उप सभापती धनंजय वाडकर आणि संचालक मंडळ   उपस्थित राहत होते   , त्याकाळात कांदा बटाटा ,भाजीपला आणि फळ मार्केटची   पुनर्बांधणी कशी करावी यासाठी उपायोजना करा असे सांगण्यात आले होते . मार्केट संचालक यांनी पुनर्बांधणी   साठी आराखडा तयार केला होता त्यासाठी वास्तू विशारद व   विकासकासोवत चर्चा केल्याचे समजते . हे सर्व असताना संचालक मंडळ व्यापाऱ्यांना   सोवत न घेवून   विकासक सोवत परस्पर बैठक केली त्यामुळे   मार्केटच्या पुनर्बांधणीसह विकास कामे रखडली आहेत असे माहिती सूत्राने दिली आहे .
महत्वाची बाब अशी आहे की संचालकांच्या अंतर्गत वादामुळे मार्केट मधील जवळपास १५० कोटी रुपयांचा प्रकल्प पूर्ण होऊन सुद्धा   पडून राहिला आहे ,त्यामध्ये फळ मार्केटची बहुउद्देशीय इमारत   ४ वर्षापासून विक्री विना पडली आहे यांचे कारण सांगण्यात येत आहे की प्रशासनाकडून कंत्राटदाराला जवळपास ३ कोटी रुपये बिल जास्त देण्यात आलं आहे त्यामुळे   कंत्राटदार   आणि प्रशासनाचा   वाद सुरु असल्याने   प्रकल्प विक्री   विना पडून राहिले आहेत. 
बाजार समितीमध्ये संचालक मंडळ आल्यापासून जवळपास ३० ते ४० सभा घेण्यात आली आणि विविध मुद्यावर चर्चा करण्यात आली ,यामध्ये बाजार समितीच्या तिजोरीतून लाखो रुपये खर्च करण्यात आले , सभापती अशोक डक म्हणतात कोरोना काळात मार्केटच्या व्यापारावर परिणाम झाल्याने उत्पन्न कमी झाले आणि विकास कामे रखडली मात्र वस्तुस्थिती वेगळे आहे   कोरोनाकाळात मार्केट मध्ये गर्दी वाढल्याने मार्केट ७ दिवस बंद होता बाकी मार्केट मध्ये मोठा प्रमाणात गर्दी होती . मार्केटच्या परिसरात गाड्याची रांग लावली होते. अत्यावश्यक गोष्टींसाठी मुंबई APMC मार्केट सुरु होता. धान्य मार्केट आणि भाजीपाला मार्केटमध्ये मोठा प्रमाणात आवक वाढली   होती त्याकाळात मार्केटमध्ये जे शेतमाल येत होता   त्याची आवक नोंद नाही त्यामुळे कोट्यवधी रुपयांचा सेस बुडाला यासाठी सभापती अशोक डक यांनी चौकशी करण्याचे   आदेश दिले होते त्याचे काय झालं अशी बाजार आवारत चर्चा सूरु आहे.
सभापती अशोक डक   व उप सभपती धनंजय वाडकर यांच्या अध्यक्ष्यतेखाली मार्केटमध्ये कित्येकवेळा पाहणी दौरा करण्यात आले आणि ३० ते ४० सभा घेण्यात आली हे सर्व कोणासाठी केलं अशी बाजार आवारत चर्चा सुरु आहे   .   संचालक मंडळाने ३ वर्षात   व्यापारी ,माथाडी कामगार आणि ग्राहकासाठी कुठलीही कामे केली नाहीत त्यामुळे व्यापाऱ्यांनी go back चे नारे दिले होते .   सध्या संचालक मंडळाची शासन व न्यायालय दरबारी सुनावणी सुरु असताना आता दोन्ही पवारच्या फुटीमुळे संचालक मंडळ अजितदादा पवारकडे साकडे घालत आहे.
*संचालक मंडळाच्या 3 वर्षाच्या रखडलेल्या कामांची यादी पाहूया.
-२० वर्षांपासून कांदा बटाटा मार्केटचे गाळे अति धोकादायक म्हणून महापालिकाने घोषित केली आहे , व्यापार सुरु , ३ वर्षापासुन निर्णय नाही ,बैठक कागदावरच  
-मसाला मार्केटचे रस्ते ,गटार आणि सेंट्रल फॅसिलिटी बिल्डिंग समस्या कागदावर
-नियोजन शून्य अभियंत्याच्या बोगस कारभारमुळे   मार्केटच्या रस्त्यांच्या   समस्या 
-मार्केटमध्ये   झालेले अनधिकृत बांधकामावर   नियंत्रण नाही
-बाजार आवारातील शेतमालाच्या आवकवर अनियमितता
-भाजीपाला मार्केटमध्ये बोगस कोड वापरून सेस मध्ये कोट्यवधी रुपयांचे झोल
-व्यपाऱ्याची दफ्तार तपासणी   नसल्याने लाखोंचं नुकसान
-FD चे ६५ कोटी वरून   १०० कोटी झाले मात्र अद्याप पैसे नाही
-FSI चे शिल्लक ६० कोटी अदयाप   गुलदस्तात
-बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीला ग्रहण
-नियोजनशून्य कारभारामुळे बाजार समितीच्या जवळपास १५० कोटीचे प्रकल्प ३   वर्षांपासून धूळखात पडून
-फळ मार्केटच्या बहुउद्देशीय इमारत प्रश्न आद्यप कागदावरच
-मुंबई APMC मार्केटच्या उत्पन्नमध्ये वाढ नाही मात्र पाचही मार्केटची पुनर्विकास करण्यासाठी धावपळ
-फुटपाथ वर अतिक्रमण झाल्याने मार्केटमधे फुटपाथ गायब