मुंबई APMC घनकचरा विभाग व स्वच्छता अधिकारी यांच्या भोंगळ कारभार; दाना मार्केट मैं \
वेळ ,त्रास आणि कंत्राटदाराचा फायदासाठी सर्रासपणे जाळला जातोय कचरा, कायद्याची होतेय पायमल्ली
कचरा जाळल्यामुळे पर्यावरणाचे तर नुकसान होते शिवाय आरोग्याच्याही तक्रारी उद्भवतात
मार्केटच्या कचरा उचल्याऐवजी जाळला जातोय कचरा जाळल्यामुळे प्रदूषणात मात्र भर पडत आहे
मार्केट मधून कचरा उचलण्यासाठी महिन्यात लाखो रुपया बाजार समितीतर्फे खर्च केला जातोय मुंबई APMC मार्केटमधील रस्ते झाडताना जमा होणारा कचरा जमा करण्याचा त्रास आणि वेळ वाचवण्यासाठी तसेच कंत्राटदाराला फायदा करण्यासाठी बाजार समितीचे घनकचरा व्यवस्थापन व स्वच्छता अधिकाऱ्याने नवीन उपक्रम राबवली आहे .या उपक्रम माध्यमात मार्केट मधील कचरा उचल्याऐवजी स्वच्छता कर्मचाऱ्यामार्फतच जाळला जात आहे. त्यामुळे बाजार समितीचे घनकचरा व्यवस्थापन व स्वच्छता अधिकारी राष्ट्रीय हरित लवाद म्हणजेच एनजीटीच्या कचरा जाळण्यावर बंदीच्या आदेशाचे सर्रास पणे उल्लंघन करत आहे .या कचरा जाळल्यामुळे मार्केट मधे प्रदूषणात भर पडत आहे.
मुंबई Apmc धान्य मार्केट मधील स्वच्छता अधिकाऱ्याने काम वाचवण्यासाठी व कंत्राटदारला फायदा करण्यासाठी मार्केट मधील कचरा सर्रासपणे जाळला जातोय . बाजार समितीतर्फे दर महिन्यात कचरा उचल्यासाठी जवळपास १५ लाख रुपये खर्च केला जातोय .मात्र घनकचरा व्यवस्थापन व स्वच्छता अधिकारी यांच्या आशीर्वादाने कंत्राटदार कचरा उचल्याऐवजी जाळले जात आहे त्यामुळे बाजार घटकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे .मार्केट मधे ७ ते ८ दिवसापासून कचरा पडून राहिल्याने व्यापारी तक्रार करतात मात्र कचरा उचल्याऐवजी त्याच जागेवर जाळला जात आहे त्यामुळे कचरातून निघणारे धूर संपूर्ण परिसरात पसरतात .
कचरा जाळल्याचे परिणाम
धूलिकण : कचराजाळल्याने २.५, १० अशा सर्वच आकाराचे धूलिकण बाहेर पडतात. ते श्वासासोबत फुप्फुसाच्या आतील पल्मेनेरी भागात पोहाेचतात. या ठिकाणीच दूषित वायू शुद्ध करून त्यापासून रक्ताला ऑक्सिजन देण्याचे कार्य सुरू असते. हे कण रक्तात मिसळतात. ते डोळ्यांमध्ये जळजळ निर्माण करतात. घसा दुखणे, नाक वाहने, खोकला, हृदयविकार, छातीदुखी असा त्रास जाणवतो.
प्रदूषण: सेंद्रियकचरा जाळल्यामुळे ४० टक्के कार्बन डायऑक्साइड तर ३२ टक्के कार्बन मोनोक्साइड बाहेर पडते. कचऱ्याच्या प्रकारानुसार सल्फर ऑक्साइड, नायट्रस ऑक्साइड आणि हेवी मेटल हवेत मिसळतात. यामुळे हवेचे प्रदूषण होते. तर जळालेला कचरा जमिनीचे प्रदूषण करतो.
आगीची भीती : जळणारा कचरा उडून आग भडकण्याची शक्यता .मार्केट मधे बाहेरून येणाऱ्या शेतमालाची गाड्या उभे आहेत त्याच ठिकाणी कचरा जाळल्याने गाड्यात आग लागू शकता . पुन्हा कचरा : कचराजळाल्यामुळे तयार झालेली राख हवेसोबत पसरते. त्यातून नवीन कचरा तयार होतो.