मुंबई APMC भाजीपाला होलसेल मार्केटमध्ये भाजीपाल्याचे दरात तफावत - शेतकरी आणि ग्राहकांची फसवणूक!
नवी मुंबई : मुंबई Apmc भाजीपाला घाऊक बाजारत भाजीपाल्याचा दरात मोठी वाढ झाली आहे.   बाजार आवारात टोमॅटो,मिर्ची ,आले ,वाटाणा फ्लॉवर या सारखा भाजीपाला पेट्रोलच्या   भावात विकला जात आहे तर दुसरीकडे बाजारसमितीला जेवढ्या प्रमाणात सेस मिळायला हवा तेवढा मिळत नसल्यामुळे   मार्केट उपसचिव आणि कर्मचाऱ्यावर शंका व्यक्त केली जात आहे.  
मुंबई कृषी उत्पन्न बाजारसमितीचे सचिव राजेश भुसारी यांनी मार्केटचे उत्पन्न वाढविण्यासाठी पाचही मार्केटला टारगेट दिले आहेत सर्व मार्केटचे अधिकारी आणि कर्मचारी मार्केट मध्ये सेस कसे वाढतील यासाठी धावपळ करत आहेत मात्र भाजीपाला मार्केटचे अधिकारी ,कर्मचारी आणि सुरक्ष अधिकारी मार्केटचे सेस वाढवण्या ऐवजी घटवण्याची तयारीत दिसून येत आहेत.  
मुंबई APMC भाजीपाला होलसेल मार्केटमध्ये दोन दर आकारले जात असल्याने ग्राहक तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत. शिवाय बाजार समिती प्रशासन प्रसिद्ध करत असलेले दर आणि मुळात बाजार आवारात असलेले दर यात मोठी तफावत असल्याचे समोर आले आहे. भाजीपाला मार्केटमध्ये आज जवळपास ६०० गाड्यांची आवक झाली असून बाजारसमितीने दिलेल्या किमतीत आणि खऱ्या बाजार भावात कश्या प्रकारे तफावत दिसत आहे पहा या रिपोर्ट मध्ये ...
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनाकडून देण्यात आलेल्या बाजार भाव पत्रकात फ्लॉवरचा भाव 12 रुपय प्रतिकिलो मात्र मार्केट मध्ये फ्लॉवर ७० रुपये प्रतिकिलो विकला जात आहे. तसेच टोमॅटो   ६०-७० रुपये प्रतिकिलो मात्र प्रत्यक्षात टोमॅटो १००-१२० रुपय किलो ने मार्केट मध्ये विकला जात आहे. हिरवी मिरचीचा दर ६० रुपये दाखवण्यात आला आहे मात्र बाजार आवारात हीच हिरवी मिरची १०० ते १२० रुपये प्रतिकिलो आहे तर गाजरही ३८ रुपये दाखवण्यात येत आहे मात्र बाजार आवारात त्यची किंमत ५० रुपये प्रतिकिलो इतकी आहे अशा प्रकारे बाजार आवारात सगळ्याच भाज्यांचे दर वाढलेले असताना देखील बाजार समितीकडून कमी भाव दाखवले जात असून या मध्ये असे दिसून येत आहे की, शेतकर्यांची आणि ग्राहकांची   फसवणूक होऊन व्यापाऱ्यांना   फायदा केला जात आहे.बाजार आवारात खरेदी केला जाणारा माल मुंबई आणि उपनगरात   किरकोळ व्यापार्यांकडून दुप्पट आणि तिप्पट किमतीने विक्री केला जातो   त्यामुळे त्याचा परिणाम ग्राहकांवर आणि शेतकर्यांवर झालेला दिसून येत आहे. यावर पणन मंत्री एकनाथ शिंदे आणि सचिव राजेश भुसारी काय कारवाई करतील याकडे सर्वांचे लक्ष्य लागली आहे .
मुंबई apmc मधील सर्व भाजांचे दर वाढून सुद्धा   शेतकऱ्याला हमीभाव मिळत नाहीय. शेतकऱ्याने पाठवलेल्या शेतमालाची लाखो रुपये थकबाकी वर्षानुवर्षे व्यापारी ठेवत आहेत. पैशांसाठी शेतकरी फक्त हेलपाटे घालताना दिसत आहेत तसेच बाजार समितीला योग्य सेस सुद्धा मिळत नाहीये. त्यामुळे बाजार समितीचा सेस नक्की जातो कुठे ? बाजार समिती प्रशासन यावर गप्प का? शेतकरी आणि ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या त्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी बाजार घटक करत आहेत. यावर पणन मंत्री, मुख्यमंत्री आणि सचिव   लक्ष देणे गरजेचे आहे.
शेतकरी ते ग्राहक दरातील तफावत
पाऊस सुरु झाली कि भाज्यांचे दरात वाढ होतो . सध्या मुंबई एपीएमसी भाजीपाला घाऊक बाजारात जवळपास ५०० ते ६०० गाड्यांची आवक होत आहे. बाजार आवारात करण्यात आलेल्या खरेदी-विक्रीच्या सर्वेक्षणातून शेतकरी ते ग्राहक दरातील तफावत प्रकर्षाने समोर आली आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती ही आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ आहे. या बाजारसमितीमध्ये विविध राज्याचे शेतमाल येत असतो . घाऊक बाजारात चार पाकळ्या आहेत.
एकाच मार्केटमध्ये दुप्पट दरात भाजीपाला विक्री
या मार्केटमध्ये जवळपास 80 टक्के व्यापाऱ्यांनी व्यापार न करता आपले गाळे भाड्याने दिले आहेत. एका गाळ्यामध्ये 4 ते 5 जण अनधिकृतपणे व्यापार करतात. डी विंगमध्ये पूर्णपणे किरकोळ दरात भाज्या विकल्या जात आहेत या विंगमध्ये   भाजीपाल्याची ३० ते २०० रुपये प्रतिकिलो दराने विक्री होत आहे. तर इतर पाकळीमध्ये ४० ते ८०   रुपये किलो भावाने भाजीपाला विकला जात आहे. अशाप्रकारे सध्या एकाच मार्केटमध्ये दुप्पट दराने भाजीपाला विक्री केला जात आहे. यावर बाजार समितीचे अधिकारी ,कर्मचारी ,मापाडी आणि सुरक्षा अधिकारी आप आपल्या जबाबदारी घेत नसल्याचे दिसून येत आहे त्यामुळे शेतकरी ,ग्राहक आणि बाजार समितीला मोठा प्रमाणात नुकसान सहन करावा लागत आहे यावर नियंत्रण येणे गरजेचे आहे.
स्वाभिमानी शेतकरी संगठनाचे पदाधिकारी साजिद मुल्ला   यांनी सांगितले की, व्यापारी व्यापाऱ्याच्या हिताचे काम करणार शेतकऱ्यांसाठी नाही. या घाऊक बाजारात दोन दराने विक्री केल्याने मार्केटमधून जाणाऱ्या भाजीपाला उपनगराला चार पट भावाने विक्री केला जातो. त्यामुळे शेतकरी आणि ग्राहकाला मोठा नुकसान होते. यामध्ये   बाजार समितीचे अधिकारी आणि कर्मचारी जबाबदार आहेत यावर   राज्याचे मुखमंत्री आणि पणन मंत्री लक्ष्य द्यायला पाहिचे नाही तर आम्ही स्वाभिमानी शेतकरी संगठन तर्फे निदर्शन करणार त्याचिउ जबाबदार स्वतः बाजार समितीचे सचिव राहणार
शेतकरी आणि ग्राहकांचं नुकसान
घाऊक बाजारात कमी दराने मालाची विक्री केली जाते. मात्र, त्याच ठिकाणी किरकोळ मार्केटमध्ये दुप्पट भावाने माल विकला जातो. एकीकडे कमी किंमतीला विकला जाणारा माल तर दुसरीकडे मात्र हाच माल दुप्पट तिप्पट किंमतीच्या भावाने विकला जातो. त्यामुळे APMC मार्केटमध्ये भाजीपाल्याचे एकच मार्केट असून जागेच्या भाड्याच्या किंमतींमुळे अनधिकृत पणे व्यापारी भाज्यांचे भाव वाढवत आहेत. त्यामुळे त्याचा परिणाम शेतकऱ्यांवर आणि ग्राहकांवर झालेला दिसून येत आहे.
व्यापाऱ्यांची नेमकी भूमिका काय?
या बाबतीत बाजारात काही व्यापाऱ्यांना विचारपूस केली असता व्यापाऱ्यांनी सांगितले की, बाजार समितीमध्ये संचालकांनी डी पाकळीमधील भाजीपाला किरकोळ भावात विकण्यासाठी सूट दिली आहे. नियंत्रण बाजार समितीचे सूट देतात संचालक. शिवाय या अवैध व्यापाऱ्यांकडून बाजार समितीचा सेस भरणा होत नाही. त्यामुळे प्रतिदिन जवळपास सरासरी ५०० ते ६०० गाड्यांची आवक होऊन देखील बाजार समितीकडे ५० टक्के सेस जमा होत आहे बाकी ५० टक्के सेस कोणाच्या खिशात जात आहे यावर लक्ष्ज्ञ देण्याचे गरजेचे आहे . सूत्राने सांगितले प्रमाणे   मार्केट संचालकांनी काही अधिकारी ,कर्मचारी आणि सुरक्षा अधिकाऱ्यांना हाताशी धरून काही व्यपाऱ्याच्या फायदा करीत आहे . यामध्ये शेतकरी ,ग्राहक आणि बाजारसमितीला मोठा नुकसान होत आहे तर दुसरीकडे या अवैध व्यपार्याकडून लाखो रुपये   वसुली करणाऱ्या काही अधिकारी आणि कर्मचारी बाजार समिती संपण्याच्या मागे असल्याचे निदर्शनास येत आहे. यावर पणन मंत्री आणि मार्केट सचिव काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Vegetable prices rose in Mumbai and suburbs, The difference in the price of vegetables in the wholesale market premises)
मुंबई APMC होलसेल भाजीपाला   मार्केटमध्ये सर्व भाज्यांचे दर काय आहेत? घ्या जाणून
परवर -४० ते ५० रुपये प्रतिकिलो 
भेंडी - ४० ते ६० रुपये प्रतिकिलो 
आले -१८० -२१० रुपये प्रतिकिलो 
गाजर - ३० ते ५० रुपये प्रतिकिलो 
टोमॅटो ९० ते १२० रुपये किलो
कोबी - ४० ते   ६० रुपये प्रतिकिलो 
शिमला -४० ते   ५५ रुपये प्रतिकिलो 
कारली -५० ते   ६० रुपये प्रतिकिलो 
वांगी - ५० ते ६५ रुपये प्रतिकिलो
फ्लॉवर -   ७० रुपये प्रतिकिलो
कोथिंबीर -२० ते ३० रुपये जुडी 
मेथी -२० ते   ३० रुपये जुडी 
हिरवी मिरची -१०० ते   १२० रुपये प्रतिकिलो