समृद्धी महामार्गाचा दुसरा टप्पा उद्घाटनासाठी तयार , कधीपासून जाता येणार सरळ ६०० किलोमीटरपर्यंत ..
मुंबई: राज्याची राजधानी मुंबई आणि उपराजधानी नागपूरला जोडणाऱ्या समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्पाचे उद्घाटन (Samruddhi Mahamarg Inauguration) होऊन सहा महिने झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांच्या हस्ते डिसेंबर महिन्यात लोकार्पण झाले होते. नागपूर ते मुंबई असा 701 किलोमीटच्या लांबीच्या या महामार्गावरील नागपूर ते शिर्डी हा टप्प्या सर्वसामान्यांना वाहतुकीसाठी खुला झाला होता. आता दुसरा टप्पा वाहतुकीसाठी खुला होत आहे. यामुळे सरळ ६०० किलोमीटरचा प्रवास समृद्धी महामार्गावरुन करता येणार आहे.
कधी होणार दुसरा टप्पा
हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचा दुसऱ्या टप्प्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. २६ मे रोजी संध्याकाळी शिर्डीत लोकार्पण सोहळा होणार आहे. शिर्डी ते भरवीर असा ८० किलोमीटर महामार्गाचे लोकार्पण मुख्यमंत्री करणार आहे. यामुळे नागपूर ते भरवीर असा ६०० किमीचा प्रवास समृद्धी महामार्गावरुन करता येणार आहे.
14 जिल्ह्यांना जोडणारा महामार्ग
14 जिल्ह्यांना जोडणारा हा 701 कि.मी. लांबीचा समृद्धी आहे. 55 हजार कोटी महाकाय बजेट या महामार्गासाठी आहे. देवेंद्र फडणवीसांच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात म्हणजेच 7 सप्टेंबर 2016 रोजी या महामार्गाची अधिसूचना काढण्यात आली. नागपूर ते मुंबईपर्यंतचा हा समृद्धी महामार्ग भारतातील पहिला आणि जगातील तिसरा सर्वात मोठा महामार्ग आहे. एकूण 710 किलोमीटर लांबीचा असलेला हा रस्ता तयार झाल्या नंतर नागपूर मुंबई हे संपूर्ण अंतर फक्त 6 तासात गाठणे शक्य होणार आहे. या महामार्गावरुन वाहने ताशी दीडशे किमी वेगाने धावू शकतात.
महामार्गावर 11 लाखांपेक्षा जास्त झाडं लावली जाणार आहेत. हिरवळ आणि पर्यावणाचं संतुलन राखले जाणार आहे. नागपूर हे देशाचं मध्यवर्ती केंद्र आहे. दूध, भाजीपाला तसेच इतर उत्पादन मुंबईला कसा जाईल, यासाठी हा महामार्ग तयार करण्यात आला आहे. या महामार्गामुळं मुंबईतील बाजारपेठ विदर्भातील शेतकऱ्यांसाठी खुली होणार आहे.
महामार्गाभोवती 18 कृषी केंद्र
महामार्गाभोवती 18 कृषी केंद्र राहतील. दुष्काळी पट्ट्यात 1 हजार शेततळी होणार आहेत. महामार्गावर 33 मोठे पूल, 274 छोटे पूल, 65 उड्डाणपूल, 8 रेल्वे पूल आहेत. त्याशिवाय 6 बोगदे, हलक्या वाहनांसाठी 189 भुयारी मार्ग, प्राणी आणि पादचाऱ्यांसाठी 209 भुयारी मार्ग असतील.