मुंबई APMC चे माजी सभापती अशोक डक यांच्या कडून आचारसंहितेचे उल्लंघन?
नवी मुंबई : लोकसभा, विधानसभा, तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना असणाऱ्या आचारसहिंता आता कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकांची देखील तयारी सुरु झाली आहे. यंदा बाजार समितीच्या निवडणुकांना प्रथमच आचारसंहिता लावण्यात आली आहे. यात प्रामुख्याने मतदान सुरू होण्यापूर्वी २४ तास अगोदर प्रचारावर बंदी आली आहे. सदर आचारसंहितेचे पालन होत आहे की नाही, आचारसंहिता भंग केली जातेय   का,या सर्व बाबींवर देखरेख ठेवण्यासाठी स्वतंत्र अधिकाऱ्यांची नेमणूकदेखील करण्यात आली आहे. दुसरीकडे मुंबई APMC सभापती अशोक डक यांनी सभापती पदाचा राजीनामा देउन सुद्धा बाजार समितीच्या गाडीचा वापर करीत आहे . सध्या अशोक डक माजलगाव बाजार समितीमध्ये निवडणुकीत उभे आहेत ,त्यांनी आपल्या पदाच्या दुरुपयोग करून बिनधास्तपणे बाजार समितीच्या गाडीचा वापर निवडणुकीच्या कामासाठी करीत आहे.. त्यामुळे माजी सभापती अशोक डाक यांच्या कडून आचार संहिताचे उलंघन करीत आहे असे स्पष्ट होत आहे...
मुंबई APMC सभापती अशोक डक आणि उप सभापती धनंजय वाडकर यांनी डिसेंबर महिन्यात राजीनामा दिले होते. उप सभापती धनंजय वाडकर यांनी बाजार समितीचे गाडी   परत केले मात्र ४ महिन्यापासून सभापती अशोक डक आपले   पदाच्या दुरुपयोग करून बाजार समितीच्या गाडी निवडणुककाळात वापर करीत आहे .. निवडणुकी लागल्या पासून गाडी माजलगाव मध्ये फिरत होती परंतु १५ एप्रिल रोजी सकाळी मुंबई APMC प्रशासकीय इमारती मध्ये डक यांच्या वाहन चालकांनी गाडी उभी केली आहे ..   आज माजलगाव मधून गाडी आणल्याची कबुली त्यांनी यावेळी दिली आहे .कायद्यात मुंबई APMC च्या गाड्या आपल्या हद्दीत वापरणे बंधनकारक असते मात्र अशोक डक राजीनामा देउनही बाजार समितीच्या गाडीचा वापर करून माजलगाव ते   मुंबई वेगवेगळे दौरे करत आहेत ..
त्यामुळे डक यांनी आचार साहितेच्या भंग केल्याचे स्पष्ट होतेय . यावर निवडणुक आयोग काय कारवाई करतील याकडे   सर्वांचे लक्ष्य लागले आहे ..
कायद्यात मुंबई APMC च्या गाड्या आपल्या हद्दीत वापरणे बंधनकारक आहेत   मात्र   माजी सभापती अशोक डक आपल्या पदाच्या दुरुपयोग करून   आपल्या मतदार संघात बिनधास्तपणे वापर करीत आहे . सभापती अशोक डक ज्यावेळी बाजार समितीमध्ये सभापती पदावर आले होते त्यावेळी त्यांनी सांगितले होते कि बाजार समितीचे उत्पन वाढवण्यासाठी विविध उपायोजना राबवणार मात्र स्वतःच राजीनामा देउन ४ महिन्यापासून बाजार समितीच्या गाडी माजलगाव ते   मुंबई वेगवेगळे दौरे करत आहेत ..
सदर आचारसंहिता अंमलबजावणी करण्याचे अधिकार जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी (कृषी उत्पन्न बाजार समिती) यांना असतील. जिल्हा उपनिबंधक सतीश खरे यांनी जिल्ह्यातील बाजार समित्यांसाठी असलेली आचारसंहिता लागू केली आहे.
अशी आहे आचारसंहिता
१. आदर्श आचारसंहिता निवडणुकीसाठी तत्काळ प्रभावाने लागू होईल, बाजार समितीच्या क्षेत्रात तिच्याशी निगडित बाबींसाठी ही आचारसहिंता लागू असेल.
२. नामनिर्देशनपत्र सुरू होण्याच्या तारखेपासून ते मतमोजणी संपेपर्यंत ही आचारसंहिता राहील.
३. मतदानास सुरवात होण्यापूर्वी २४ तास अगोदर प्रचार बंद होईल.
४. आचारसंहितेचे पालन करणे सर्व संबंधितांना बंधनकारक आहे.
५. आचारसंहितेच्या अंमलबजावणीत बाजार समितीच्या दैनंदिन कामकाजात खंड पडता कामा नये. अत्यावश्यक निविदा काढणे, जाहिराती देणे आदींसाठी राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाची परवानगी बंधनकारक राहील.
६. बाजार समितीचा कोणताही सेवक, त्या बाजार समितीच्या निवडणुकीत प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरीत्या सहभाग घेणार नाही. सेवकाने निवडणुकीमध्ये व प्रचारामध्ये कोणत्याही उमेदवारासाठी अथवा पॅनलसाठी प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षरीत्या सहभागी होऊ नये. या काळात सर्व सेवक हे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या अधिपत्याखाली येतील.
७. आचारसंहिृताकाळात बाजार समितीच्या सेवकांच्या बदल्या करता येणार नाही. निवडणूक निर्णय अधिकारी निवडणूक कामकाजाच्या सोईसाठी व निवडणूक कालावधीपुरते निवडणुकीचे कामकाजासाठी त्यांची बदली करू शकतील.
८. बाजार समितीच्या खर्चाने पूर्ण झालेल्या कामांचे उद्घाटन समारंभ आदी याकाळात आयोजित करता येणार नाहीत.
९. आचारसंहिता कालावधीत बाजार क्षेत्रात किंवा बाजार क्षेत्राच्या बाहेरही संस्थेच्या खर्चाने संचालक मंडळाने दौरे करू नयेत. विश्रामगृहाचा वापर संचालकास, उमेदवारास करता येणार नाही.
१०. बाजार समितीची सर्व वाहने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या अधिपत्याखाली राहतील. निवडणूक निर्णय अधिकारी बाजार समितीच्या वाहनांचा वापर निवडणुकीच्या कामकाजासाठी व संस्थेच्या दैनंदिन कामकाजासाठी करू शकतील. कोणत्याही परिस्थितीत निवडणुकीच्या काळात प्रचारमोहीम, निवडणूक कार्य किंवा निवडणुकीशी संबंधित प्रचार करण्यासाठी बाजार समितीच्या वाहनांचा वापर होणार नाही.
११. निवडणुकीशी संबंधित व्यक्तीस शस्त्रास्त्रे बाळगता येणार नाहीत. ही बंदी निवडणूकप्रक्रिया पूर्ण होईपर्यंत अमलात राहील.
१२. प्रचाराचा कालावधी संपल्यानंतर इलेक्ट्रॉनिक मीडयिाद्वारे देखील प्रचारावर बंदी राहील.
१३. आचारसंहितेच्या कालावधीमध्ये संबंधित बाजार समितीच्या सेवेत भरती करण्याच्या दृष्टीने जाहिराती देणे, मुलाखती घेणे इ. करण्यात येऊ नये.
१४. बाजार समितीच्या अधिमंडळाचे वार्षिक, तसेच संचालक मंडळ व विविध समित्यांच्या (विषय समित्या इ.) बैठका ज्या कायद्यानुसार घेणे बंधनकारक आहे, त्या घेता येतील. परंतु त्यात मतदारांवर प्रभाव पडेल, असे कोणतेही निर्णय घेता येणार नाहीत.