मुंबई APMC सभापतींच्या आशीर्वादाने मार्केट बनलं गुन्हेगारांचा अड्डा
मुंबई APMC फळ व भाजीपाला मार्केट झाली धर्मशाळा, परप्रांतीयांची घुसखोरी
बॉम्ब ,अमेरिकन डॉलर ,चोरी ,हत्या ,गुटखा ,गांजा गंभीर गुन्हा घडवून मार्केट मध्ये वास्तव्य
दिवसा मजुरी ,रात्री गंभीर गुन्ह्याचं आश्रयस्थळ बनलं भाजीपाला व फळ मार्केट
NMMC व   POLICE यांनी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे
Apmc News update : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फळ व भाजीपाला मार्केटचे धर्मशाळेमध्ये रूपांतर झाले आहे. जवळपास ६ ते ८ हजार   परप्रांतीय व्यापारी व फेरीवाल्यांनी मार्केटमध्ये अतिक्रमण केले आहे. नियम धाब्यावर बसवून सुरू असलेल्या व्यापाराला APMC प्रशासनाकडून अभय मिळू लागले आहे. मार्केटची सुरक्षाही धोक्यात आली असून, अवैध व्यापाराला अभय देणाऱ्यांवर कारवाई करण्या ऐवजी त्यांना पाठिंबा दिला जात आहे .
APMC पोलिसांनी ६ दिवसापूर्वी कमी किमतीत अमेरिकन डॉलर देण्याचे प्रलोभन दाखवून लाखो रुपयांना फसवणूक करणाऱ्या एका टोळीतील ८ जणांना अटक केली आहे त्यामध्ये मोहमद शाहिद अब्दुल बारीक शेख मुंबई APMC फळ मार्केट गाळा क्र. F -७२   मध्ये राहत होता. हे सर्व दिवसभर फळ व भाजीपाला मार्केट मध्ये मजुरीचे काम करतात आणि रात्री त्याच गाळ्यावर राहतात तसेच बाहेर जाउन घरफोडी,फसवणूक असे विविध प्रकार गुन्हा करून ते मार्केटमध्ये परततात.   दोन महिन्यापूर्वी कोलकत्ता पोलिसांनी फळ मार्केट मधून दोन आरोपीना अटक केली होती. हे दोघे कोलकत्ता मध्ये राजकीय वादातून झालेल्या दंगली मध्ये बॉम्ब फेकून पसार झाले होते व फळ मार्केट मध्ये येऊन राहत होते . या पूर्वी देखील पोलिसांनी फळ व भाजीपाला मार्केटमधून चोरी ,हत्या ,गांजा ,गुटखा आदी गुन्हा मध्ये शामिल होणाऱ्या नागरिकांना अटक केली होती. या सर्व घटनेमुळे मार्केटमधील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. मार्केटमध्ये सर्व नियम धाब्यावर बसविले जात आहेत. दिवसरात्र मुक्काम ठोकणाऱ्या परप्रांतीय कामगारांप्रमाणेच अनधिकृतपणे व्यापार करणाऱ्यांच्या संख्येतही वाढ झाली आहे.
भाजीपाला व फळ मार्केटमधील जवळपास ८० टक्के व्यापाऱ्यांनी स्वतः व्यवसाय न करता आपले गाळे भाडेतत्वावर दिले आहेत, तसेच गाळ्यावर अनधिकृत बांधकाम करून त्यामध्ये भाडेकरू ठेवले आहे. बाजार समिती प्रशासन   व पोलिसांकडे मार्केटमध्ये अनधिकृतपणे वास्तव्य करणाऱ्या परप्रांतीय नागरिकांचा कुठलाही रेकार्ड किवा ओळखपत्र नाही. कायद्याने भाडेकरू ठेवताना सर्व माहिती स्थानिक पोलिसांकडे सादर करणे बंधनकारक असते. मात्र APMC प्रशासनाकडून याबाबतची माहिती स्थानिक पोलीस स्टेशनला देण्यात येत नाही. दहशतवादी कारवाया आणि गुन्हेगारी पार्श्वभूमीवर एखादा गुन्हा घडल्यावर त्याची तात्काळ उकल होण्यासाठी व्यापाऱ्यांनी गाळे भाड्याने देताना भाडेकरूंची संपूर्ण माहिती पोलीस स्टेशनला देणे आवश्यक असते. जेणेकरून दहशतवादी आणि गुन्हेगारी कारवाया आटोक्यात आणण्यासाठी मदत होईल. मात्र भाजीपाला व फळ मार्केटमध्ये जवळपास ६ ते ८ हजार नागरिक अनधिकृतपणे वास्तव्यास ठेवणाऱ्या त्या व्यापारी ,मार्केट संचालक व APMC प्रशासनवर कुठलीही कारवाई होत नाही . बाहेर नैयजेरियन नागरिकांना ठेवणाऱ्या घर मालकांवर   कारवाई होत आहे तर APMC मार्केटमध्ये त्या गाळाधारकांवर कारवाई का होत नाही? . व्यवसाय न करणाऱ्या त्या व्यापाऱ्यांचे गाळे ताब्यात घेण्याची मागणी जोर धरू लागली आहे . 
-बाजारसमिती प्रशासनाने दिलेल्या माहितीप्रमाणे फळ   मार्केटमध्ये ९४५ गाळाधारक व्यापारी (अडते) कार्यरत असून, ३९६ बिगरगाळाधारक अडत्यांसह ही संख्या १३४१ एवढी आहे परंतु प्रत्यक्षात मार्केटमध्ये ५ हजारपेक्षा जास्त व्यापारी व्यवसाय करत आहेत. जवळपास ३ हजार   पेक्षा जास्त जणांकडे व्यवसाय करण्याचा परवानाच नाही. परवानाधारकांपेक्षा अनधिकृत व्यापार करणाऱ्यांची संख्या जास्त झाली आहे. विशेष म्हणजे, विनापरवाना व्यापार करणाऱ्यांमध्ये बहुतांश परप्रांतीय आहेत. मार्केटमधील मोकळे पॅसेज, ओपन शेड, लिलावगृहासह जागा मिळेल त्या ठिकाणी व्यापार केला जात आहे. हीच परिस्थिती भाजीपाला मार्केटची देखील आहे.   मार्केटमध्ये राज्यातील व देशातील अनेक जण कृषीमाल विक्रीसाठी मागवत आहेत. गेटवरून गाळाधारक किंवा बिगरगाळाधारक पण परवाना असलेल्या व्यापाऱ्यांच्या नावाने माल आत मध्ये आणला जात आहे. अनेक गाळाधारकांना त्यांच्या नावाने गाडी आतमध्ये बोलावल्याची माहितीच नसते. मार्केटमधील गाळ्यांच्या बाहेरील मोकळ्या जागेवरही किरकोळ विक्रेत्यांनी ठाण मांडला आहे. होलसेल मार्केटमध्ये किरकोळ भाजीपाला व फळांची विक्री करण्यास परवानगी नाही परंतु शेकडो परप्रांतीय सार्वजनिक वापराच्या जागेवर बसून भाजीपाला व   फळांची विक्री करत आहेत. याशिवाय मागील काही महिन्यांमध्ये फेरीवाल्यांची संख्याही वाढली आहे. खाद्यपदार्थांपासून पान, बिडीपर्यंत सर्व वस्तूंची फेरीवाले विक्री करत आहेत. यामधील एकाकडेही बाजारसमितीचा परवाना नाही. अनधिकृत फेरीवाले व व्यापाऱ्यांची नावे, पत्ते, मूळ गाव याची कोणतीही माहिती प्रशासनाकडे उपलब्ध नाही. यामधील अनेकांनी त्यांच्याकडे परप्रांतीयांना नोकरीसाठीही ठेवले आहे. परवाना नसलेल्यांवर तत्काळ कारवाई होणे आवश्यक आहे पण बाजारसमिती प्रशासन काहीही कारवाई करत नाही. मार्केट संचालक , अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या संगनमताने व काही व्यापाऱ्यांचाही वरदहस्त असल्यामुळे मार्केटला धर्मशाळेचे स्वरूप प्राप्त झाले आहे. नोंदणी नसलेल्यांमुळे मार्केटची सुरक्षा धोक्यात आली असून, संबंधितांवर कधी व कोण कारवाई करणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
कायदा धाब्यावर
महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम १९६३ मधील तरतुदीनुसार मुंबई कृषी उत्पन्न बाजारसमितीची स्थापना करण्यात आली आहे. या कायद्याप्रमाणे परवाना असलेल्यांनाच मार्केटमध्ये व्यवसाय करता येतो पण सद्यस्थितीमध्ये प्रशासनाने नियम व कायदे धाब्यावर बसवून परवाना नसलेल्यांना अभय देण्याचे धोरण स्वीकारले असून, याविषयी मुख्यमंत्री व पणनमंत्र्यांकडेही तक्रार करण्यात येणार आहे. आर्थिक हितसंबंध तपासण्याची गरज बाजारसमितीमध्ये अधिकृत व्यापाऱ्यापेक्षा अनधिकृतपणे व्यवसाय करणाऱ्यांची   संख्या वाढली आहे. मार्केटमधील सार्वजनिक वापराच्या जागेसह जिथे जागा मिळेल तेथे व्यापार केला जात आहे. मार्केटची धर्मशाळा झाल्यानंतरही प्रशासन काहीच कारवाई करत नाही. अवैध व्यवसाय करणाºयांना अभय देण्यामागे आर्थिक हितसंबंध दडले असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. कार्यवाहु सभापती व सचिवांनी याची दखल घेऊन ज्यांच्याकडे परवाना नाही त्यांना मार्केटमध्ये प्रवेश देऊ नये, अशी मागणी होऊ लागली आहे. मार्केटमधील सुरक्षा व अनागोंदी कारभारावरून स्पष्ट नाराजी व्यक्त केली जात आहे, ज्यांच्याकडे परवाने नाहीत त्यांच्यावर तत्काळ कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. प्रशासनानेही दहा दिवसांत कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे पण प्रत्यक्षात कारवाई होणार का? याविषयी अद्याप साशंकता व्यक्त केली जात आहे