9.31 मिनिटांनी भारतावर 26 % टॅरिफ लागू, जाणून घ्या कुठल्या उत्पादनांच्या निर्यातीला बसणार फटका

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केलेला रेसिप्रोकल टॅरिफ आजपासून लागू झाला आहे. जवळपास 180 देशांवर हा टॅरिफ लागू झाला आहे. सकाळी 9.31 मिनिटांनी भारतावर रेसिप्रोकल टॅरिफ सुरु झाला. भारतावर लावण्यात आलेल्या या टॅरिफनंतर आजपासून अमेरिकेत निर्यात होणाऱ्या भारतीय सामनावर 26 टक्के आयात शुल्क आकारले जाईल. या टॅरिफचा भारतात वेगवेगळ्या स्तरांवर परिणाम दिसून येईल. अमेरिकेत भारतातून निर्यात होणाऱ्या सामानावर 26 टक्के टॅरिफ लागल्यामुळे निश्चित त्या वस्तुंच्या किंमती वाढतील.
ज्या देशांवर कमी टॅरिफ आहे, त्यांच्यामुळे भारतीय उत्पादनांना फटका बसू शकतो. कारण त्याच वस्तू कमी किंमतीत अमेरिकन विक्रेत्यांना उपलब्ध होतील. भारतातून अमेरिकेला निर्यात होणाऱ्या वस्तुंमध्ये इलेक्ट्रॉनिक्स, रत्न, दागिने, ऑटोमोबाइल आणि टेक्सटाइल उत्पादने आहेत.
निर्यात होणाऱ्या कुठल्या भारतीय उत्पादनांवर जास्त परिणाम?
ट्रम्प यांच्या रेसिप्रोकल टॅरिफचा सर्वात जास्त परिणाम औषधांवर होईल. भारतातून अमेरिकेत स्वस्त औषधांची निर्यात होते. भारताकडून अमेरिका 12 अब्ज डॉलर्सची औषधे आणि फार्मा प्रोडक्ट्स विकत घेते. 2023-24 मध्ये भारताचा अमेरिकेसोबत ट्रेड सरप्लस 35.32 अब्ज डॉलर होता. टॅरिफमुळे हा सरप्लस कमी होईल.
अमेरिकेसोबत व्यापार भारतासाठी का फायद्याचा?
कॉमर्स मिनिस्ट्रीनुसार भारतातून अमेरिकेत 73.7 अब्ज डॉलर्सची निर्यात, तर अमेरिकेकडून 39.1 अब्ज डॉलर्सच्या सामानाची आयात होते. अमेरिकेचे आकडे यापेक्षा वेगळे आहेत. अमेरिकन आकड्यानुसार भारताकडून 91.2 अब्ज डॉलर्सची निर्यात तर 34.3 अब्ज डॉलर्सच्या सामानाची आयात होते. अमेरिकेसोबत व्यवसाय नेहमीच भारतासाठी फायद्याचा सौदा ठरला आहे. कारण आयात कमी आणि निर्यात जास्त आहे. अमेरिकेने टॅरिफच्या रुपाने भारतीय सामानावर लावलेल्या टॅरिफमुळे निर्यात कमी होऊ शकते.
अमेरिकन सामानावर भारतात किती टॅरिफ लागतो?
वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायजेशनच्या आकड्यांनुसार भारतात सरासरी टॅरिफ सर्वात जास्त आहे. भारतात सरासरी टॅरिफ 17 टक्के आणि अमेरिकेत 3.3 टक्के आहे. ग्लोबल ट्रेड रिसर्च इनिशिएटिवच्या रिपोर्ट्नुसार अमेरिकेतून भारतात येणाऱ्या खाण्या-पिण्याच सामान, मीट आणि प्रोसेस्ड फूडवर भारतात 37.66 टक्के टॅरिफ लागतो. तेच भारत याच सामानावर अमेरिकेत 5.29 टक्के टॅरिफ देतो. ऑटोमोबाइलवर भारतात 24.14 टक्के आणि अमेरिकेत 1.05 टक्के टॅरिफ आकारला जातो. दारुवर भारतात 124.58 टक्के तर अमेरिकेत 2.49 टक्के टॅरिफ लागतो.