पाऊस कमी, उत्पादन घटले; पण अमरावतीच्या बाजारात शेतमालाला बंपर भाव! सोयाबीन, तूर, हरभरा अन् कापूस हमीभावाच्या पुढ
तुरीला १०,७५१ रुपये, सोयाबीनला ६,८५० रुपयांपर्यंत दर खासगी बाजारातील तेजीमुळे शासकीय खरेदी केंद्रांकडे शेतकऱ्यांची पाठ फिरण्याची शक्यता
अमरावती : यंदा पावसाने ओढ दिल्याने खरीप हंगामातील पिकांच्या उत्पादनात मोठी घट झाली. सोयाबीन आणि कपाशीच्या पिकांना पावसाच्या अनियमिततेचा सर्वाधिक फटका बसला. अनेक शेतकऱ्यांच्या हातात अपेक्षेपेक्षा कमी उत्पादन आले. मात्र, दुसरीकडे अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीत दाखल होणाऱ्या शेतमालाला चांगला भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. सोयाबीन, तूर, हरभरा आणि कापूस या चारही पिकांचे बाजारभाव शासनाच्या हमीभावापेक्षा अधिक असल्याचे चित्र आहे.
अमरावती बाजार समितीत सोयाबीनला प्रतिक्विंटल ६,६५० ते ६,८५० रुपये, तुरीला १०,१०० ते १०,७५१ रुपये, तर हरभऱ्याला ६,७०० ते ७,२०० रुपये दर मिळत आहे
रीने गाठला १० हजारांचा टप्पा सोयाबीनलाही हजार रुपयांचा फायदा
सोयाबीनसाठी शासनाने प्रतिक्विंटल ५,७०८ रुपये हमीभाव निश्चित केला आहे. मात्र, अमरावती बाजार समितीत सोयाबीनला ६,६५० ते ६,८५० रुपये दर मिळत आहे. म्हणजेच हमीभावापेक्षा ९४२ ते १,१४२ रुपये अधिक भाव मिळत आहे. चांगल्या दर्जाच्या सोयाबीनला व्यापाऱ्यांकडून मागणी असल्याने दरात तेजी दिसून येत आहे.
तुरीच्या दराने तर शेतकऱ्यांचे लक्ष वेधले आहे. तुरीचा हमीभाव ८ हजार रुपये असताना बाजार समितीत १०,१०० ते १०,७५१ रुपये दर मिळत आहे. म्हणजेच हमीभावापेक्षा २,१०० ते २,७५१ रुपये अधिक भाव मिळत आहे. उत्पादनातील घट आणि बाजारातील मागणी यामुळे तुरीच्या दराला आधार मिळत असल्याचे चित्र आहे.
रभऱ्याला ७,२००, कापसाला ९ हजारांचा भाव
हरभऱ्याचा हमीभाव ५,८७५ रुपये असताना अमरावती बाजार समितीत ६,७०० ते ७,२०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळत आहे. त्यामुळे हमीभावाच्या तुलनेत ८२५ ते १,३२५ रुपये अधिक मिळत आहेत.
कापूस उत्पादकांनाही बाजारभावातून दिलासा मिळत आहे. कापसाच्या दर्जानुसार शासनाने निश्चित केलेल्या हमीभावापेक्षा बाजारातील दर अधिक असल्याचे चित्र आहे. अमरावती बाजारात कापसाला ८,८०० ते ९,००० रुपये प्रतिक्विंटल दर मिळत आहे. मात्र, पावसाच्या खंडामुळे उत्पादन घटल्याने चांगल्या दराचा फायदा मर्यादित राहण्याची शक्यता आहे.
खासगी बाजारात तेजी सरकारी खरेदी केंद्रांचे काय?
शेतकऱ्यांना हमीभाव मिळावा यासाठी शासनाकडून शासकीय खरेदी केंद्रे सुरू केली जातात. मात्र, यंदा अमरावती बाजार समितीत बहुतांश प्रमुख पिकांना हमीभावापेक्षा अधिक दर मिळत असल्याने शेतकरी खासगी बाजाराला पसंती देऊ शकतात. त्यामुळे शासकीय खरेदी केंद्रांवर यंदा किती शेतकरी माल विक्रीसाठी आणतात, याकडे लक्ष लागले आहे.
दर वाढले, पण उत्पादन घटल्याने शेतकऱ्यांचे गणित बिघडले!बाजारात चांगला भाव मिळत असला तरी उत्पादन घटल्याने शेतकऱ्यांचा आर्थिक फायदा मर्यादित राहणार आहे. एकीकडे प्रतिक्विंटल दरात वाढ झाली, तर दुसरीकडे विक्रीसाठी उपलब्ध असलेला मालच कमी झाला आहे.
“बाजारात शेतमालाला सध्या चांगला भाव मिळत आहे. मात्र, यंदा सरासरी उत्पादन कमी झाले आहे. पावसाअभावी कपाशी आणि सोयाबीनचे मोठे नुकसान झाले असून, चांगला दर मिळूनही शेतकऱ्यांचे आर्थिक गणित पूर्णपणे सुधारलेले नाही.”
— अशोक व्यवहारे, शेतकर