जुलै महिन्यात खाद्यतेलाची आयात वाढले नाही, तर मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता
International Oil Market: आंतरराष्ट्रीय बाजारात मागील काही महिन्यांपासून खाद्यतेलाचे भाव कमी झाले होते. त्यामुळे भारतात आयात वाढली. जुलै महिन्यात खाद्यतेलाची आयात मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. जुलै महिन्यात देशात खाद्यतेल आयात जळपास १९ लाख टनांवर पोहचू शकते, असा अंदाज आयातदारांनी व्यक्त केला.
देशात सणांचा काळा तोंडावर आहे. त्यामुळे रिफायनरींकडून खाद्यतेल आयातीवर जोर दिला जाऊ शकतो. तर दुसरीकडे रशिया आणि युक्रेनमध्ये पुन्हा मतभेद झाल्याने सूर्यफुल तेलांच्या उपलब्धतेविषयी अनिश्चितता आहे. यामुळे देशात रिफायनरी उद्योग चालू महिन्यात आयातीवर जोर देत आहे. जाणकारांच्या मते, भारताला पामतेल मोठ्या प्रमाणात मिळू शकते. मलेशिया आणि इंडोनेशिया पामतेलाची निर्यात करत आहेत. पण पामतेलाचे भावही मागील काही दिवसांमध्ये वाढले आहेत. भारताच्या मागणीने पामतेलाच्या भावाला आणखी आधार मिळू शकते.
भारताची खाद्यतेल आयात आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या दराला आधार देणारी ठरु शकते. पामतेलाचे दर आधीच मागील साडेचार महिन्यांपासून वाढलेले आहेत. त्यालाही आधार मिळेल. तसेच रशियाला सूर्यफुल तेलाचा स्टाॅक कमी करण्याची संधी मिळेल. पण भारताची आयात वाढल्याचा लाभ सोयातेलालाही मिळू शकतो. सोयातेलाचे भाव मागील काही दिवसांपासून वाढलेले आहेत. त्यात पुढील काळातही सुधारणा दिसू शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
देशात चालू महिन्यात जवळपास १९ लाख टन खाद्यतेल आयात होण्याचा अंदाज आहे. खाद्यतेल डिलर्स आणि कार्गो सर्वेक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार, २४ जुलैपर्यंत देशातील विविध बंदरांवरून जवळपास १५ लाख टन खाद्यतेल बाहेर आले, म्हणजेच देशातील रिफायनरी आणि बाजारात आहे. तर उर्वरित ७ दिवसांमध्ये आणखी जवळपास ४ लाख टन खाद्यलेलाला जुलै महिन्यात क्लिअरन्स मिळू शकते. 
मागील तेलवर्षात म्हणजेच २०२१-२२ च्या वर्षात भारतात महिन्याला जवळपास ११ लाख ७० हजार टन खाद्यतेल आयात झाली. तर जून २०२३ मधील खाद्यतेल आय़ात १३ लाख टनांच्या दरम्यान होती. सध्या युक्रेनमधून खाद्यतेल निर्यातीबाबत अनिश्चितता आहे. याचा दबाव पुढील काळात आणखी वाढण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आयातदार खाद्यतेलाचा पुरेसा स्टाॅक करत आहेत.