कांद्याला मिळतोय चांगला भाव, शेतकऱ्यांना दिलासा
 
नवी मुंबई : केंद्र सरकारने कांद्यावर निर्यांतशुल्क लावल्यामुळे मागच्या काही दिवसांपासून कांद्याच्या मुद्यावरून राज्यात जोरदार खंडाजंगी सुरू होती. दरम्यान ऐन सणासुदीच्या काळात शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे.
कांदाला चांगला दर मिळत आहे . कांद्याचे भाव पुन्हा एकदा वर चढू लागले आहेत. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे कांदा बटाटा घाऊक बाजारपेठेत कांद्याच्या दर ३० ते ५० वर गेला आहे तसेच नाशिकच्या लासलगाव बाजारात कांद्याचे दर एकाच आठवड्यात ३७ टक्के वाढले असून प्रतीनुसार किंमत ३५ ते ६० रुपये किलो असा दर झाला आहे.
कांद्याचा भाव २३ रुपये किलोवरून ५० रुपये किलोवर गेला आहे. राज्यात झालेला कमी पाऊस आणि कांदा काढणीच्या वेळी झालेल्या अवकाळी पावसाने यंदा कांदा उत्पादनाला मोठा फटका बसला आहे. यामुळे उत्पादन कमी झाली आहे तर आवक वाढली आहे. तसेच मागच्या काही दिवसांत कांद्याचे दर वाढले असताना केंद्राने बफर स्टॉक कांदाही बाहेर काढला होता.
दुसरीकडे तुर्की कांद्याच्या निर्यात बंद कलेला आहे तर अफगाणिस्तानच्या कांदा भारतात आली असून ३६ रुपये किलोने विकला जात आहे त्यामुळे येणाऱ्या काळात कांदाच्या दरात वाढ होण्याची शक्यता वागविले जात आहे ,कांदा बटाटा व्यपाऱ्याने सांगितले कि ज्या पर्यंत नवीन फसलं येत नाही त्या पर्यंत कांद्याच्या दरात वाढ होणार आहे . साधारणतः दोन महिन्या पर्यंत राहणार .
जेथे सरकार घाऊक बाजारात कांदा विकत आहे, तेथे कांद्याचे दर तुलनेने कमी प्रमाणात म्हणजेच ७ ते १० टक्के वाढले आहेत. याबाबत कांदा व्यापारी यांच्या म्हणण्यानुसार, यंदा खरिपातील लाल कांद्याचे पीक एक महिना उशिराने बाजारात येणार आहे. त्यामुळे भाव वाढ होत आहे.
दरम्यान २०२२-२३ च्या सरकारी अंदाजानुसार, यंदा गहू आणि डाळींच्या उत्पादनातही कपात होणार आहे. गव्हाचे उत्पादन २२ लाख टनांनी घटून ११.०५ कोटी टन राहण्याची शक्यता आहे. डाळींचे उत्पादन १५ लाख टनांनी घटून २.६ कोटी टन राहण्याची शक्यता आहे. तांदूळ, मोहरी आणि मका यांचे मात्र विक्रमी उत्पादन होण्याची शक्यता आहे.
लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत उन्हाळ कांद्याच्या भावात चांगली सुधारणा होऊन प्रति क्विंटल कमीतकमी ३ हजार रुपये, जास्तीतजास्त ४ हजार ५५१ रुपये तर सरासरी ४ हजार २०० रुपये इतका भाव मिळाला आहे. सध्या कांद्याची आवक कमी होत असल्यामुळे भाव टिकून आहे. दोन महिन्यांपूर्वी कांद्याला कवडीमोल भाव मिळाला होता. त्यावेळी शेतकऱ्यांना उकिरड्यावर कांदा फेकून देण्याची वेळ आली होती.