समृद्धी महामार्गालगत कोणत्या 16 ठिकाणी स्मार्ट सिटी बनणार? महायुती सरकारचा मास्टरप्लॅन रेडी
मुंबई : युती सरकारचा आणि त्यातल्या त्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्त्वाकांक्षी ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या समृद्धी महामार्गाचे काम आता पूर्णत्वास गेला आहे. आगामी काही दिवसात समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा ही कार्यान्वित होणार आहे आणि त्यानंतर समृद्धी महामार्गावर 16 ठिकाणी स्मार्ट सिटी प्रकल्प तयार करण्याच्या हालचालींना आता वेग आला असून येत्या 30 डिसेंबर रोजी स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या बाबतीत मुंबईत उच्चस्तरीय बैठक बोलावण्यात आली असल्याची माहिती मिळाली आहे. समृद्धी महामार्गाच्या या दुसऱ्या टप्प्यात सुरू होणार असलेल्या स्मार्ट सिटी नेमकं काय आहे पाहूयात....
समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा आता पूर्णत्वास
देवेंद्र फडणवीस यांचा महत्त्वकांक्षी असलेला प्रकल्प म्हणजे समृद्धी महामार्ग नागपूर आणि मुंबई यातील अंतर कमी व्हावं यासाठी 701 किलोमीटरचा समृद्धी महामार्ग आता पूर्णत्वास जात आहे शेवटचा टप्पा ही काही दिवसात कार्यान्वित होणार आहे, मात्र त्यानंतर याच प्रकल्पाचा दुसरा टप्पा असलेल्या स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या कामाला आता सरकार येतात. पहिल्या शंभर दिवसात प्राधान्याने करावयाच्या कामांमध्ये स्मार्ट सिटी प्रकल्पाची कामे असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे आणि त्यानुसार समृद्धी महामार्ग लगत सरकार 16 ठिकाणी स्मार्ट सिटी बनवणार असल्याची माहिती आहे.
कोणत्या 16 ठिकाणी स्मार्ट सिटी बनणार?
समृद्धी महामार्गालगत कोणत्या 16 ठिकाणी स्मार्ट सिटी बनणार आहेत पाहूयात
1- विरुल (चेनेज - 80 ) वर्धा. 
2 - दत्तपुर ( चेनेज - 105.7) अमरावती. 
3 - शिवनी ( चेनेज - 137.5) अमरावती. 
4 - शेह ( चेनेज - 182.5 ) कारंजा वाशिम. 
5 - वानोज ( चेनेज - 210.5 ) वाशिम. 
6 - रिधोरा ( चेनेज - 239.6 ) वाशिम. 
7 - साब्रा ( चेनेज - 283.3) मेहकर बुलढाणा 
8 - माळ सावरगाव ( चेनेज - 340) बुलढाणा 
9 - जामवाडी ( चेनेज - 365) जालना. 
10 - हडस पिंपळगाव ( चेनेज -470) 
11 - जांबरगाव (चेनेज - 488.5) संभाजीनगर. 
12 - धोत्रा (चेनेज 505) कोपरगाव नगर. 
13 - सावळा विहीर (चेनेज - 520) नगर. 
14 - फुगाले (चेनेज - 635) ठाणे. 
15 - सपगाव (चेनेज - 670 ) ठाणे. 
16- लेणाड (चेनेज - 673) ठाणे.
राज्यात महायुतीचे सरकार आल्या आल्याचं पहिल्या शंभर दिवसात प्राधान्याने करावयाच्या कामांमध्ये स्मार्ट सिटीमधील पहिल्या दोन ठिकाणी स्मार्ट सिटीच्या कामांना आता वेग आला आहे. यात नागपूर जवळील वर्धा जिल्ह्यातील विरून तर बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा जवळ माळसावरगाव येथील स्मार्ट सिटीच्या कामांचा समावेश आहे.... या दोन्ही ठिकाणी कृषी क्षेत्राशी निगडित उद्योग उभारले जाणार असल्याची माहिती आहे.
समृद्धी महामार्गालगत तयार होत असलेल्या या स्मार्ट सिटी प्रकल्पामुळे कोणते कोणते फायदे होणार?
कृषी संबंधित उद्योग व्यवसाय निर्माण होऊन शेतकऱ्यांना याचा फायदा होईल.स्मार्ट सिटी असलेल्या परिसरात मोठ्या प्रमाणावर युवकांना रोजगार मिळेल.
कृषी , वाणिज्य , निर्यात आयात व्यवसायाचे संबंधित उद्योग या ठिकाणी निर्माण झाल्यामुळे शेतकऱ्यांना फायदा होईल.
परिसरातील असलेले निगडित लघुउद्योगांना चालना मिळेल.
स्मार्ट सिटी असलेल्या परिसरातील शेतकऱ्यांना आपला शेतमाल निर्यात करायसाठी जेएनपीटी, वाढवन अशा बंदरांना कनेक्टिव्हिटी मिळेल.
समृद्धी महामार्गावरील वाहतुकीसाठी पूर्णपणे खुला होत असताना आता सरकारने समृद्धीची निगडित स्मार्ट सिटी प्रकल्पांच्या उभारणीसाठी वेग दिला आहे. येत्या 30 तारखेला मुंबई उच्चस्तरीय बैठक होत असून त्यामुळे स्मार्ट सिटी प्रकल्पांच्या कामांना वेग येईल अशी माहिती मिळाली आहे.