Year Ender 2023: मुंबई APMC मध्ये काय घडलं ?
 
  -शेतकरी ते बाजार समिती , वर्षभरात काय घडलं? या दहा घटनांमुळे 2023 वर्ष राहिल लक्षात
Year Ender 2023 : आपण सर्वजण 2023 या वर्षाला निरोप (Good bye 2023) देण्यासाठी आणि २०२४ या नवीन वर्षाचं स्वागत (New Year २०२४) करण्यासाठी सज्ज झालो आहोत. २०२४ या नवीन वर्षासाठी अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. दरम्यान, २०२३ या वर्षभरात आशिया खंडातील मोठी बाजारपेठ असलेल्या मुंबई APMC सह राज्याचे बाजार समितीमध्ये काय घडामोडी घडल्या? हे वर्ष मुंबई APMC साठी   कसं गेलं? २०२३ हे वर्ष शेतीसाठी, राज्यातील शेतकऱ्यांसाठी नेमकं कसं गेलं? मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये या   सालात नेमक्या काय घडामोडी घडल्या याचा सविस्तर आढावा आपण घेणार आहोत.....
Heavy Rain : अतिवृष्टीनं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान
यावर्षी राज्यात पावसानं कहरच केला होता. सुरुवातील जून महिन्यात पावसानं दडी मारली होती. मात्र, नंतरच्या काळात म्हणजे जुलै महिन्याच्या शेवटी आणि ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी राज्यात धुमाकूळ घातला होता. या पावसामुळं शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं होतं. शेतकऱ्यांची उभी पीक वाया गेल्यानं शेतकरी संकटात सापडला होता. सोयाबीन, कापूस, तूर, फळबागांना मोठा फटका बसला होता. तसेच यावर्षी परतीचा पाऊस लांबल्याचा फटकाही शेतकऱ्यांना बसला. अतिवृष्टीतून वाचलेली उरली सुरली पीक या परतीच्या पावसानं वाया गेली. 
या पावसाचा मराठवाडा आणि विदर्भाला मोठा फटका बसला होत
 
-मुंबई APMC मधील   आणि बाहेरील वाहतूक व्यवस्थापनावर मार्केट संचालकाच्या   दुर्लक्ष झाल्याने बाजार समिती आवार आणि परिसर वाहतूक कोंडीच्या विळख्यात अडकली आहे.
-Toilet scam : मुंबई APMC शौचालय घोटाळा राहिला चर्चेत ,जवळपास ८ कोटीच्या शौचालय घोटाळा प्रकरणात सहकार बिभागातर्फे एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आली असून आता पर्यंत नवी मुंबई आर्थिक गुन्हे शाखाने ११ जणांवर गुन्हा दाखल केला आहे यामध्ये   ३ जणांना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरु आहे .
- FSI Masala Market : मुंबई APMC मसाला मार्केटमधील ६२ कोटीच्या FSI विक्री घोटाळावर नागपूर अधिवेशनात मुद्दा गाजला , यावर राज्याचे पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी चौकशी करण्याची आदेश दिली आहे .
- मुबई APMC मधील १८ संचालकयापैकी   १२ अपात्र संचालकांना न्यायालयातून तात्पुरती स्थगिती मुळे आता पर्यंत राज्याचे मुख्यमंत्री व पणन मंत्री यांनी सभापती व उप सभापती निवडणूक लावली नाही . एक वर्षांपासून बाजार समितीमध्ये कार्यबाहु सभापती कार्यरत आहे .
-२०२२-२०२३ मध्ये मार्केटच्या एकही धोरणात्मक निर्णय नझाल्याने मार्केट खड्यात गेले आहे
-फळ मार्केटमध्ये अग्नितांडब या आगीत ३० गाळे   जाळून खाक झाली मात्र संचालक मंडळ व प्रशासनातर्फे अद्याप मार्केटमध्ये आगीवर नियत्रंण करण्यासाठी कुठल्याही उपायोजना केला नाही .
-बाजार समिती मध्ये मागील ४ वर्षांपासून १५० कोटीच्या प्रकल्प बांधून सुद्धा विक्री बिना धूळखात पडले आहेत ,यावर संचालक मंडळ व प्रशासन कुठल्याही निर्णय घेतली नाही .
-कांदा बटाटा व मसाला मार्केट सेंट्रल फॅसिलिटी इमारत अतीधोकादायक असून सुद्धा यामध्ये व्यापार   सुरु आहे ,पणन मंत्री व संचालकमंडळ बैठक घेऊनसुद्धा पुनर्विकास कागदावरच आहे
-राज्याचे ३०७ बाजार समितीच्या कामकाज साठी दांगट समितीच्या गठन प्रत्येक बाजार समितीच्या पाहणीदौरा करण्यात आली आहे . कमिटीतर्फे   शासनाला रिपोर्ट देण्यात आली असून लवकरात लवकर निर्णय येणार आहे .
-मुंबई APMCतील १२ अपात्र संचालक ,दांगट समितीच्या अभ्यासदौरा ,बाजार समितीच्या ४० A चौकशीमधून संचालक मंडळावर ग्रहण
-मुंबई APMC भाजीपाला व   फळ मार्केटात ८० टक्के अनधिकृत व्यापार   मुंबई APMC च्या   फळ आणि भाजीपाला मार्केटचे धर्मशाळेमध्ये रूपांतर झाले आहे. जवळपास ८० टक्के   परप्रांतीय व्यापारी व फेरीवाल्यांनी मार्केटमध्ये ठाण मांडून बसले आहे . नियम धाब्यावर बसवून सुरू असलेल्या व्यापाराला मार्केट संचालक व प्रशासनाकडून अभय मिळू लागले आहे. मार्केटची सुरक्षाही धोक्यात आली असून, अवैध व्यापाराला अभय देणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी प्रामाणिक   व्यापाऱ्यांकडून करण्यात येत आहे .
 
-मुंबई कृषि उत्पन्न बाजार समितीमधील खरेदी विक्रीची कार्यपध्दती, किंमत, बाजारभाव व नियोजीत प्रकल्प इत्यादीची माहिती घेण्यासाठी जागतिक बैंकचे अर्थतज्ञ डॉ. फ्रान्सिस डारको यांनी आज प्रकल्प अधिका-यांसोबत बाजार समितीस भेट दिली. या वेळी जागतिक बैंकचे अर्थतज्ञ डॉ. फ्रान्सिस डारको, जागतिक बैंकचे सल्लागार डॉ.अरुण कुलकर्णी, बाजार समितीचे अधिकारी व निवडक व्यापारी व अडते उपस्थित होते.
- Apmc शौचालय घोटाळामध्ये   पोलिसांकडून FIR दाखल करण्यात आलेल्या ४ अधिकाऱ्यांवर मुंबई Apmc सचिव पी एल खंडागळे यांनी निलंबनाची कारवाईं केली आहे. बाजारसमितीच्या इतिहासातील आतापर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई आहे.
-पणन मंत्री APMC मार्केटच्या पाहणी दौऱ्यात असताना संचालक मंडळ गोव्यात मौजमस्ती केल्याने बाजारघटकांमध्ये असंतोष निर्माण झाली .
-मुंबई APMC मसाला मार्केट संचालक यांनी वेकायदेशीरपणे बेदाणाचे लिलाव गृह सुरु केला होता .या लिलाव गृह स्वतःचे गोदामात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले होते ,पणन संचालकांनी सदर लिलाव गृहात शेतकऱ्यांची   फसवणूक होत असून बंद करण्याचे आदेश दिले