Mashroom : अशी सुरू करा मशरूमची शेती, ४५ दिवसांत कमाई होणार सुरू
नवी दिल्ली : छोट्या आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी मशरूमची शेती फायदेशीर होऊ शकते. या मशरूम शेतीसाठी जास्त जमीन किंवा पैशांची गरज नसते. शेतकरी ही शेती घरीही सुरू करू शकतात. मशरूम शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकार अनुदान देते. मशरूम शेती करत असाल तर जास्त फायदा मिळू शकतो. देशात सर्वात जास्त मशरूमचे उत्पादन बिहारमध्ये होते. यापूर्वी ओडिशा राज्य मशरूम उत्पादनात नंबर वन होता. राष्ट्रीय फळबाग बोर्डानुसार, २०२१-२२ मध्ये बिहारमध्ये २८ हजार टन मशरूमचे प्रोडक्शन झाले होते. देशातील मशरूम उत्पादनाच्या १० टक्के उत्पादन झाले होते.
बिहार सरकार मशरूम उत्पादनाला चालना देण्यासाठी अनुदान देते. मशरूम शेतीसाठी ७५ टक्के अनुदान देण्यात येते. उत्तर प्रदेश सरकार मशरूम शेतीला चालना देते. उत्तर प्रदेशात शेतकऱ्यांना मशरूम शेती करण्यासाठी ४० टक्के अनुदान मिळते.
ओएस्टर मशरूम उत्पादन करा
तुम्ही मशरूम शेतीचा प्लान करत असाल, तर त्यासाठी ओएस्टर जातीचे मशरूम उत्पादन करा. कारण उन्हाळ्यात ही मशरूम चांगल्या पद्धतीने वाढते. मार्च ते सप्टेंबर महिना या शेतीसाठी चांगला समजला जातो. या जातीच्या मशरूमचे वजन २५० ग्राम अशते.
बीजांचे रोपण केल्यानंतर ३० ते ४५ दिवसांत मशरूमचे उत्पादन होते. एका बॅगपासून शेतकरी १५० ते २०० रुपये मिळवू शकतात. एक बॅग मशरूम उगवण्यासाठी ५० रुपये खर्च येतो. शेतकरी हे मशरूम विकत असतील तर त्यांना १५० रुपये शुद्ध नफा मिळतो.
४५ दिवसांत करू शकता कमाई
ओएस्टर जातीच्या मशरूमची शेती गहू प्रणालीच्या प्रोसेसमधून केली जाते. भुशात ओएस्टर जातीचे बीज रोपण केले जाते. अशाप्रकारे ३० ते ४५ दिवसांत मशरूम तयार होतात. ओएस्टर जातीसाठी २५ ते ३५ डिग्री सेल्सिअस तापमान हवे. या मशरूम लागवडीतून शेतकरी ४५ दिवसांत उत्पन्न घेऊ शकतात. या मशरूममध्ये आरोग्यदायी कंटेंट असल्याने मागणी जास्त आहे. त्या तुलनेत मशरूम उत्पादन होत नाही. त्यामुळे मशरूम उत्पादकांसाठी ही एक चांगली संधी आहे.