नागरिकांच्या मदतीसाठी अजित पवार अॅक्शन मोडवर; मात्र मुंबई APMC प्रशासन ( टेकू ) च्या मोडवर
मुंबई : महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये सध्या मुसळधार पाऊस पडत आहे. गेल्या आठ दिवसांमध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये पूर आला. त्यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय. पुरात अनेकजण वाहून गेली. तसेच अनेक गावांमध्ये पुराचं पाणी शिरल्यामुळे गावकऱ्यांचं घरादाराचं नुकसान झालं. तसेच शहरात अति धोकादायक इमारतीमध्ये राहतात   आणि व्यवसाय करतात   या सगळ्या घटनांची गंभीर दखल महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली आहे. त्यांनी आज विधान परिषदे या सगळ्या घटनांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या मदतीसाठी प्रशासनाला सूचना दिले आहे ,मात्र उप मुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेला बाजार समिती प्रशासनने केराची टोपली दाखवली आहे .मुंबई APMC   कांदा बटाटा मार्केट नवी मुंबई महापलिकने २० वर्षापासून अति धोकादायक घोषित केली आहे तसेच मसाला मार्केट मध्ये सेंट्रल फॅसिलिटी इमारत ३ वर्षा पासून अति धोकादायक आहे तरी सुद्धा या   धोकादायक गाळ्यावर व्यापार सुरु आहे . ७ दिवसापूर्वी कांदा   बटाटा मार्केटमध्ये स्लॅब कोसळला . रात्रीच्या वेळी कोसळल्यामुळे कुठल्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही दिवसात कोसळले असतील तर मोठा जीवित हानी झालं असता .दुसऱ्यादिवशी महापालिकाचे अधिकारी ,अति धोकादायक गाळे सील करण्यासाठी पोहचले मात्र व्यपाऱ्याने विनंती केल्याने सील केले नाही. मुंबई APMC सचिव राजेश भुसारी ,पोलीस अधिकारी व   व्यपाऱ्यासोबत या धोकादायक गाळे संदर्भात बैठक झाली, या बैठकीत मार्केटमध्ये कुठल्याही प्रकारची घटना दुर्घटना घडली त्याचे जबावदार वयापारी राहणार अशी लिखित पत्र गाळेधारक बाजारसमितीला देणार आहे यावेळी व्यपाऱ्याने सांगितलं   त्यामुळे महापालिका अधिकारी निघून गेले .मात्र ७ दिवस झाली महापालिकेला व्यपार्याकडून बाजार समिती प्रशासनने कुठल्याही पत्र दिले नाही त्यामुळे मार्केट मध्ये बाजार घटक भीतीच्या वातावरण मध्ये राहत आहे.दुसरीकडे मार्केट अभियंता आता अति धोकादायक गाळ्यावर टेकू लावण्याची उद्योग सुरु केली आहे . वयापारी सांगतात कि २० वर्षांपासून तुम्ही आमचं मार्केटमध्ये टेकू लावले आहे मात्र हि टेकू सुरक्षित नाही ,आता परत   टेकू का लावण्यात येत आहे . व्यापारी सांगतात टेकू सुरक्षित नाही ,टेकू काढा आम्हाला आमचे गाळ्यांचे समोर आणि मागे पॅसेज आणि धक्क्यावर दुरुस्ती करण्यासाठी परवानगी द्या मात्र मार्केट अभियंताला टेकू लावून भ्रस्टाचार करायचं त्यामुळे त्यांना दुरुस्ती नको टेकू हवे, अशी प्रतिक्रिया कांदा बटाटा व्यपाऱ्याने दिली आहे .अशी टेकू अभियंत्याला हकालपट्टी करा जेणे करून २० वर्षांपासून अति धोकादायक झालेल्या मार्केट सुरळीत होईल .   यावर उप मुख्यमंत्री अजित पवार काय निर्णय घेणार सर्व बाजार घटकाचे लक्ष लागली आहे.
1) धोकादायक परिस्थिती असलेल्या भागातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात यावे. 
2) पुरस्थितीमूळे मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या कुटूंबियांना प्रत्येकी चार लाख रुपयांची मदत तातडीने द्यावी. 
3) शेती पिकांच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने सुरु करावेत. 
4) ज्या ठिकाणी शेतजमिनी खरडून गेल्या असतील त्या ठिकाणी देखिल पंचनामे त्वरित सुरु करावेत. 
5) बाधित व्यक्तींना स्वस्त धान्य दुकानातून धान्याचे वाटप तातडीने, त्याच दिवशी होईल याकरीता प्रशासनाने स्वस्त धान्य दुकानांना पुरेसा धान्याचा पुरवठा करावा. 
6) ज्यांच्या घरात पुराचे पाणी शिरले होते त्यांना सध्याच्या दराने पाच हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याची कार्यवाही तातडीने सुरु करावी. 
7)   रोगराई पसरु नये याकरीता स्वच्छता करणे, औषध फवारणी करणे यासारख्या प्रतिबंधात्मक उपाययोजना तातडीने करण्यात याव्यात. 
8) ज्या ठिकाणी पाणी दुषित झाले आहे, त्याठिकाणी स्वच्छ पाणीपुरवठा होण्यासाठी आवश्यकतेनुसार विहिरी अधिग्रहित कराव्यात. 
9) गरज असेल त्या ठिकाणी टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात यावा. 
10) ज्याठिकाणी अतिवृष्टीमुळे रस्त्यांची हानी झाल्याने गावांचा संपर्क तुटलेला आहे, अशा रस्त्यांची बांधकाम विभागाने तातडीने दुरुस्ती करावी. 
11) पुरामूळे ज्या शालेय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक साहित्य खराब झाले आहे त्यांना शिक्षण विभागाने शैक्षणिक साहित्य उपलब्ध करुन द्यावे.