NCP MLA Disqualification | राष्ट्रवादीच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट, बंद कपाटात ठेवलेली ती कागदपत्रे कुठे गेले?
मुंबई : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर आज राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणावर सुनावणी पार पडत आहे. राष्ट्रवादीच्या प्रकरणातील सुनावणीचा आज पहिलाच दिवस आहे. पहिल्याच दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांची साक्ष नोंदवण्यात आली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाच्या वकिलांनी जितेंद्र आव्हाड यांची उलटसाक्ष नोंदवण्याचा प्रयत्न केला. याचवेळी शरद पवार गटाच्या वकिलांनीदेखील जितेंद्र आव्हाड यांना काही प्रश्न विचारले. यावेळी काही प्रश्नांवर दोन्ही गटाच्या वकिलांनी आक्षेप घेतला. पण सुनावणीच्या पहिल्याच दिवशी मोठा ट्विस्ट निर्माण झालाय. कारण पक्षांतर्गत निवडणुका झाल्या होत्या का? असा प्रश्न जितेंद्र आव्हाड यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी झाल्या होत्या, असं उत्तर दिलं. पण त्याची कागदपत्रे आणि पुरावे एका बंद कपटात ठेवण्यात आले होते. ते गायब झाल्याचं स्पष्टीकरण जितेंद्र आव्हाड यांनी दिलं.
पक्षांतर्गत निवडणूक झाली होती. मात्र confidential कपाटात हे कागदपत्र ठेवण्यात आले होते. विशेष म्हणजे जबाबदारी देण्यात आलेल्या दोन माणसांनी ते गहाळ केले. संबंधित माणसं पक्ष सोडून गेले आहेत. त्यांनी या कागदपत्रांचे म्हणजे पुराव्यांचा काय केलं माहिती नाही”, असं मोठा दावा जितेंद्र आव्हाड यांनी आजच्या सुनावणीत केला. त्यामुळे आता ही सुनावणी कोणत्या स्तरावर जाते ते पाहणं जास्त महत्त्वाचं आणि रंजक होणार आहे.
नेमके सवाल-जवाब काय?
शरद पवार गटाचे वकील – याचिका दाखल कुणी केली? यावर सही कुणी केली?
जितेंद्र आव्हाड – मी स्वतः सही केली आहे. मी याचिकेवर सही केली त्यावर 12 जणांनी पक्ष विरोधी कृती केली त्यांच्यावर कारवाईची मागणी केली. त्यांना अपात्र करा असे पत्र अध्यक्ष यांना दिलं.
जितेंद्र आव्हाड – पक्षाने 12 आमदारांना जे आदेश दिले ते त्यांनी पाळले नाहीत त्यामुळं पक्ष विरोधी कृती लक्षात घेऊन शेड्युल 10 नुसार कारवाई करावी अशी मागणी आम्ही केली
शरद पवार गटाचे वकील – शरद पवार हे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवडून आले होते का? त्यावेळी तुम्ही उपस्थित होतात का?
जितेंद्र आव्हाड – ज्यावेळी शरद पवार यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड झाली त्यावेळी मी स्वतः उपस्थित होतों. यावेळी अनेकांनी भाषणं केली. सगळे वरिष्ठ नेते उपस्थीत होतें. शरद पवार यांनी ज्या ज्या वेळी भाषणं केली त्यावेळीं शाहू महाराज फुले आंबेडकर यांचे विचार पूढे घेऊन जाऊयात असं स्पष्ट केलं.
अजित पवार वकील – आव्हाड तुमचे शिक्षण किती झालं आहे?
आव्हाड – BA झालं आहे, इतिहास आणि राजकारणात, मास्टर्स ऑफ लेबर स्टडीज झालं आहे आणि इतिहासात phd केलं आहे. पण याचा संबंध येतो कुठून?
वकील – तुम्ही वकिलीची परीक्षा पास झालात का?
आव्हाड – नाही
वकील – तुम्ही संविधानाचा अभ्यास केला आहेत का?
आव्हाड – थोडे वाचले आहेत
वकील – पार्टीचे नियम वाचले आहेत का?
आव्हाड – नाही
शरद पवार गटाचे वकील – माझा याला आक्षेप आहे
जितेंद्र आव्हाड – माझ्या प्रतिज्ञापत्रात हे देखील स्पष्ट केलं होतं. जी भाषण होतं होती ती सर्व मोदी सरकारच्या विरोधात होतं होती.
शरद पवार वकील – तुम्ही पॅराग्राफ 15 मध्ये नमूद केलं आहे की राष्ट्रीय अधिवेशन 11/9/2022 पार पडलं होतं
अजित पवार गटाचे वकील – तुमचं शिक्षण काय आहे?
आव्हाड – मी मरीन इंजिनियरिंग केलं आहे. मी बीए इतिहास आणि पॉलिटिक्समध्ये केलं आहे. माझं मास्टर्स इन लेबर स्टडी केलं आहे. त्यानंतर मी मुंबई विद्यापीठातून पीएचडी केली आहे. पण हे माझ्या प्रतिज्ञापत्राशी संबंधित नाही
अजित पवार वकील – तुम्ही एलएलबी केलं आहे का? तुम्ही संविधान वाचलं आहे का? तुम्ही पक्षाचे नियम वाचले आहेत का?
आव्हाड- मी एलएलबी केलं नाही. मी संविधानाच्या काही बाबी वाचल्या आहेत. मी पक्षाचे नियम वाचले नाहीत.
वकील – तुमच्या पार्टीचे स्ट्रक्चर काय आहे?
आव्हाड – जिल्हा कमिटी, राज्य कमिटी, राज्य स्तरीय ऑफिस बेरर आणि त्या पक्षाचे अध्यक्ष. प्रत्येक राज्य अध्यक्ष डिलेगीटची नवं, रिटर्निंग ऑफिसरला नॅशल कानवेन्शनला पाठवतो आणि ते नॅशनल अध्यक्ष ठरवतात.
अजित पवार वकील – पंचायत कमिटी आहेत की ब्लॉक कमिटी आहेत?
आव्हाड – मी त्याचा उल्लेख केला आहे. वेगवेगळी नावं आहे. शेवटच्या स्थरावरून पहिल्या स्थरापर्यंत निवडणूका घेतल्या जातात. निवडणुका आजपर्यंत घेतल्या गेल्या आहेत, त्या घेतल्या जातात.ही माहिती पक्षाचे माजी अध्यक्ष सुनील तटकरे 2015 आणि 2018 ला निवडणूका झाल्या ही माहिती त्यांनी वकिलांना द्यायला हवी होती, म्हणजे हा प्रश्नाच उद्भवला नसता.
अजित पवार गटाकडून आक्षेप – जितेंद्र आव्हाड यांनी साक्ष देत असताना प्रतिज्ञापत्र व्यतिरिक्त इतरही कागदपत्रे सोबत ठेवली होती. विधानसभा अध्यक्षांच्या परवानगीशिवाय इतर कोणतेही कागदपत्रे सोबत ठेऊ शकत नाही. अजित पवार गटाकडून यावर आक्षेप घेण्यात आला आहे.
आव्हाड – ब्लॅाक, तालुका, जिल्हा, राज्य, डेलिगेट्स, राष्ट्रीय अध्यक्ष, राष्ट्रीय कार्यकारिणी, सेंट्रल वर्किंग कमीटी (हरारकी). सुनील तटकरे हे आमचे राष्ट्रीय सरचिटणीस होते आणि ट्रेजरर
वकील – ब्लॅाक कमिटी आणि तालुका समिती सारखीच आहे का? मी राज्य निवडणूक समितीमध्ये नाही.
आव्हाड – त्यामुळे मला या संदर्भातील पूर्ण माहिती देता येणार नाही
वकील – पंचायत, ब्लॅाक, जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय कमिटीची नियुक्ती कशी केली जाते?
आव्हाड – मला माहिती नाही
शरद पवार गटाचे वकील यांनी आक्षेप घेतला
शरद पवार गटाचे वकील – जितेंद्र आव्हाड यांना विचारण्यात आलेल्या राष्ट्रीय कर्यकरणीबाबतच्या प्रश्नांची शृंखला ही विधानसभा अध्यक्षांच्या कार्यक्षेत्राच्या बाहेरचा आहे. कारण त्यात पक्षाच्या संघटनेबद्दल प्रश्न विचारले जात आहे. सर्वोच्च न्यायालयाने सुभाष देसाई केसमध्ये १६७ परिषदेत सांगितले आहे.
अजित पवार गटाचे वकिल यांनी आक्षेपाला उत्तर दिलं
अजित पवार गटाचे वकील – अध्यक्षांना कोणता पक्ष आहे हे आणि कोणत्या पक्षाला किती पाठिंबा आहे हे बघायचे आहे आणि कोणता पक्ष आहे हे ठरवायचे आहे. आपण निवडणूक आयोगापुढे असलेल्या संरचनात्मक फुटीबद्दल ठरवायचे नाही. या गटाला संघटनात्मक पाठिंबा नाही हे सिद्ध करण्यासांठी, ते पक्षाच्या घटनेच्यानुसार आहेत का नाही? हे बघायचे आहे. ज्याची भिस्त ही संघटनेवर अवलंबून आहे.
अजित पवार गटाचे वकील – जिल्हा आणि राज्यस्तरीय कमिटी निवडणूक झाल्या होत्या का?
आव्हाड – माझ्या माहितीनुसार निवडणुका झाल्या होत्या. माझ्या माहितीनुसार निवडणुकांबाबतची माहिती एका कपाटात बंद होती. पण ती आता गहाळ झालीत. जे लोक सोडून गेलेत त्यांच्याकडे हे होतं. त्यांनी पुढे काय केलं ते माहिती नाही.