राज्यात मतदानाचा टक्का का घसरला? विचार करायला लावणारी 5 कारणे
Lok Sabha Election 2024: राज्यात तिसऱ्या टप्प्यातील मतदान मंगळवारी (7 मे) पार पडलं आहे. तिसऱ्या टप्प्यात देखील मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरवल्याचं आकडेवारीतून दिसून आलं आहे. देशभरातील आकडेवारीच्या तुलनेत राज्यातील मतदारांनी निरुत्साह दाखवला आहे. निवडणूक आयोगाच्या अंदाजे आकडेवारीनुसार, देशभरात 61.69 टक्के मतदान झालं आहे. यामध्ये सर्वात कमी 54.09 टक्के मतदान महाराष्ट्रात झालं आहे. तर आसाममध्ये सर्वात जास्त 75.30 टक्के मतदान झालं आहे. मतदानाचा हा आकडा अंदाजे आहे, यामध्ये काहीसा बदल होऊ शकतो.  
राज्यात मागील निवडणुकीच्या तुलनेत मतदानात बराच फरक दिसून येत आहे. वाढत्या उन्हाचा फटका मतदानाला बसल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. मात्र कमी झालेली मतदानाही ही आकडेवारी कुणाच्या पथ्यावर पडणार हे पाहणे औत्सुक्याचं ठरणार आहे. निवडणुकीच्या निकाल 28 दिवसांनंतर 4 जून रोजी जाहीर होणार आहे. 
महाराष्ट्रातील मतदानाची घसरलेली टक्केवारी चिंतेचा विषय ठरत आहे. नागरिक मतदान करण्यासाठी घराबाहेर का पडले नाहीत, याचा विचार निवडणूक आयोग आणि सर्वच राजकीय पक्षांनी करणे गरजेचं आहे. मतदानापासून दूर राहण्याची काय कारणे असू शकतात ,विविध प्रसारमाध्यमांची प्रतिनिधी सांगितल कारण ,
"मतदारांमध्ये उत्साह निर्माण करू शकेल असा मुद्दा प्रचारामध्ये आणण्यात सगळेच पक्ष अपयशी ठरले. ग्रामीण भागात प्रस्थापितांविरोधात राग आहे. मात्र तो वर्ष 2014 मध्ये जशी लाट निर्माण झाली होती, तशा तीव्र लाटेत रुपांतरीत होऊ शकलेला नाही." 
प्रचार  राष्ट्रीय मुद्यांऐवजी स्थानिक मुद्यांभोवती फिरला
"मतदार याद्यांमधील गोंधळ, मतदान केंद्रे न सापडणे यामुळेही टक्केवारीवर परिणाम झाला आहे. ग्रामीण भागात झालेला प्रचार हा राष्ट्रीय मुद्यांऐवजी स्थानिक मुद्यांभोवती फिरणारा दिसला. प्रचाराचा जो आवेग पाहायला मिळत होता, तो फक्त माध्यमांमध्येच दिसत होता. हाच आवेग प्रत्यक्षात दिसला नाही. जिथे चुरशीची लढत आहे, तिथे मतदारांनी मतदानामध्ये उत्साह दाखवल्याचं मतदानाच्या आकडेवारीतून दिसून येत आहे"
 
सत्ताधारी पक्षाबद्दल मतदारांमध्ये नाराजी?
"सत्ताधारी पक्षाबद्दल लोकांमध्ये नाराजी असेल आणि लोकांना पर्यायही फारसा पसंत नसेल तर मतदानात मतदारांचा निरुत्साह जाणवतो. यावेळच्या निवडणुकीत पहिल्या दोन टप्प्यात मतदारांचा निरुत्साह जाणवल्याने मतदान वाढवण्यासाठी निवडणूक आयोगाने विविध उपाययोजना राबवल्या. उष्णतेच्या लाटेमुळे पहिल्या दोन टप्प्यात कमी मतदान झाल्याचा अंदाज आयोगाने लावला होता. त्या अनुषंगाने तिसऱ्या टप्प्यात मतदान वाढवण्यासाठी उपाययोजना करूनही मतदान वाढले नाही. याचा अर्थ सत्ताधारी पक्षाबद्दल मतदारांमध्ये नाराजी असण्याची शक्यता आहे", असे मत दीपक भातुसे यांनी मांडले.
राज्यातील प्रमुख लढती
-बारामती - सुप्रिया सुळे (शरद पवार गट) विरुद्ध सुनेत्रा पवार (राष्ट्रवादी काँग्रेस)
-रत्नागिरी-सिंधुदुर्ग - नारायण राणे (भाजप) विरुद्ध विनायक राऊत (ठाकरे गट)
-सातारा- उदयनराजे भोसले (भाजप) विरुद्ध शशिकांत शिंदे (शरद पवार गट)
-रायगड- सुनील तटकरे (राष्ट्रवादी काँग्रेस) विरुद्ध अनंत गीते (ठाकरे गट)
-माढा- धैर्यशील मोहिते पाटील (शरद पवार गट) विरुद्ध रणजीतसिंह नाईक निंबाळकर (भाजप)
-कोल्हापूर - संजय मंडलिक (शिवसेना) विरुद्ध शाहू महाराज (काँग्रेस)
-सांगली- चंद्रहार पाटील (ठाकरे गट) विरुद्ध संजयकाका पाटील (भाजप) विरुद्ध विशाल पाटील (अपक्ष)
-सोलापूर- प्रणिती शिंदे (काँग्रेस) विरुद्ध राम सातपुते (भाजप)
-धाराशिव- ओमराजे निंबाळकर (ठाकरे गट) विरुद्ध अर्चना पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस)
-लातूर - सुधाकर श्रुगांरे (भाजप) विरुद्ध डॉ. शिवाजी काळगे (काँग्रेस)
-हातकणंगले - धैर्यशील माने (शिवसेना) विरुद्ध राजू शेट्टी (स्वाभिमानी) विरुद्ध सत्यजित पाटील (ठाकरे गट)