पुण्यातील शेतकऱ्याची कमाल, दोडका शेतीतून लाखोंची कमाई
पुणे: पुणे   जिल्ह्यातील भोर   तालुक्यातील भोलावडे गावच्या सुर्यकांत काळे   हे शेतकरी आहेत. त्यांनी पारंपरिक भात शेतीला फाटा देत आधुनिक एसआरटी पद्धतीचा वापर करत दोडक्याची यशस्वी शेती केली. एक एकरात सेंद्रिय कीड नियंत्रक आणि खतांच्या योग्य नियोजनामुळे त्यांनी दोडक्याचे विक्रमी उत्पादन घेतले आहे. दोडक्याला किलो मागे 45 ते 50 रुपयांपर्यंत दर मिळतोय. एसआरटी म्हणजेच शून्य मशागत पद्धतीने शेती केल्यानं, मशागतीचा खर्च पूर्णपणे वाचतोय त्याचबरोबर दोडक्याला चांगला दर सुध्दा मिळतोय. पुणे आणि परिरातल्या मार्केटमध्ये दोडक्याला चांगली मागणी आहे.
पुणे जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांनी आधुनिक पद्धतीने शेती केली आहे. त्याचा त्यांना फायदा झाला आहे. त्याबरोबर अनेक शेतकरी त्याचपद्धतीने शेती करावी असं सांगत आहेत. काही शेतकऱ्यांनी युट्यूबच्या माध्यम पाहून शेती केली आहे. ऊस आणि केळीच पीक चांगलं घेतल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं सुध्दा आहे. मागच्यावर्षी खरीप आणि रब्बी हंगाम वाया गेला असल्याचे शेतकरी सांगत आहेत. सध्या महाराष्ट्रातील सगळे शेतकरी मान्सूनची वाट पाहत आहेत. खरीप हंगामाच्या पेरणची सगळी तयारी शेतकऱ्यांनी केली आहे.
पुण्याच्या भोरमधील भोलावडे गावच्या सुर्यकांत काळे यांचं त्यांच्या भागातील शेतकरी आणि नागरिक कौतुक करीत आहेत. पारंपरिक भात शेतीला फाटा देत आधुनिक एसआरटी पद्धतीचा वापर करत दोडक्याची यशस्वी शेती त्यांनी केली आहे. त्याचबरोबर इतरांनी सुध्दा अशा पद्धतीने शेती करावी असं आवाहन केलं आहे. एक एकरात सेंद्रिय कीड नियंत्रक आणि खतांच्या योग्य नियोजनाने दोडक्याचे विक्रमी उत्पादन त्यांनी घेतलं आहे. दोडक्याला किलो मागे 45 ते 50 रुपयांपर्यंत दर मिळतं आहे. एसआरटी म्हणजेच शून्य मशागत पद्धतीने शेती केल्यानं, मशागतीचा खर्चही वाचतं आहे. दोडक्याच्या उच्च प्रतीमुळे दर चांगला मिळतं आहे. पुणे आणि परिरातल्या मार्केटमध्ये या दोडक्याला चांगलीचं मागणी वाढली आहे. त्यामुळं शेतकऱ्यांना चांगलं आर्थिक उत्पन्न मिळतं आहे.