मुंबई APMC Market Rate Today : कांदा, बटाटा, लसणाची 186 गाड्यांची आवक, जाणून घ्या आजचे बाजारभाव!
नवी मुंबई | सोमवार, 23 नोव्हेंबर 2026
मुंबई APMC वाशी येथील कांदा-बटाटा मार्केटमध्ये सोमवारी   कांदा, बटाटा आणि लसणाची मिळून एकूण 190 गाड्यांची आवक नोंदविण्यात आली. यामध्ये कांद्याच्या 118, बटाट्याच्या 60, तर लसणाच्या 12 गाड्यांचा समावेश आहे. बाजारात आज नवीन आणि जुन्या कांद्याच्या विविध प्रतवारीनुसार दर मिळत असून, लसणाचे दर 90 ते 250 रुपयांपर्यंत आहेत.
बाजार समितीच्या आवक नोंदीनुसार, आज कांद्याच्या 77, बटाट्याच्या 14 आणि लसणाच्या 8 गाड्यांची आवक झाली. मागील आवकेसह एकूण नोंद 186 गाड्यांवर पोहोचली आहे. बाजारातील उपलब्ध मालाची प्रतवारी, गुणवत्ता आणि मागणीनुसार व्यापाऱ्यांकडून खरेदी-विक्री केली जात आहे.
कांद्याचे बाजारभाव
कांदा मार्केटमध्ये नवीन महाराष्ट्र कांद्यामध्ये नंबर 1 मालाला 44 ते 48 रुपये, नंबर 2 कांद्याला 38 ते 43 रुपये, गोल्टा 31 ते 37 रुपये, गोल्टी 25 ते 30 रुपये, तर चिंगीला 20 ते 24 रुपये दर मिळत आहेत.
जुन्या महाराष्ट्र कांद्यामध्ये गोळा 46 ते 53 रुपये, साठवणीचा कांदा 40 ते 45 रुपये, अॅव्हरेज 36 ते 39 रुपये, गोल्टा 30 ते 35 रुपये आणि गोल्टी 25 ते 28 रुपये दराने व्यवहार होत आहेत. राजस्थानच्या सुक्या नवीन कांद्याला 35 ते 40 रुपये, मध्य प्रदेशच्या कांद्याला 40 ते 45 रुपये, तर इजिप्तच्या जुन्या कांद्याला 35 ते 40 रुपये दर मिळत आहेत.
बटाट्याचे बाजारभाव
बटाटा मार्केटमध्ये नवीन चांगल्या मालाला 13 ते 15 रुपये, हलक्या मालाला 10 ते 12 रुपये दर मिळत आहेत. उत्तर प्रदेशच्या झूट बारदान मालाला 6 ते 13 रुपये, लाल जाली मालाला 5 ते 12 रुपये, तर मध्य प्रदेशच्या ज्योती बटाट्याला 18 ते 22 रुपये दर मिळत आहेत.
LR वेफर्स बटाट्यामध्ये पासिंग मालाला 25 ते 30 रुपये, तर फेल मालाला 5 ते 10 रुपये दर मिळत आहेत.
लसणाचे बाजारभाव
लसूण मार्केटमध्ये जुन्या G2 लसणाच्या गोळा प्रतवारीला 200 ते 230 रुपये, मीडियमला 170 ते 190 रुपये, लाडू-दातरा मालाला 130 ते 160 रुपये, तर कळीला 110 ते 130 रुपये दर मिळत आहेत.
देशी जुन्या लसणामध्ये गोळा 170 ते 190 रुपये, मीडियम 150 ते 160 रुपये, लाडू-दातरा 110 ते 140 रुपये आणि कळी 90 ते 110 रुपये दराने विकली जात आहे. चीनच्या जुन्या लसणाला 200 ते 250 रुपये दर मिळत आहेत.